Shooting Asian Qualifiers : रुद्रांक्ष पाटील आणि मेहुली घोष यांना मिश्र दुहेरीत सुवर्ण

आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत दुसऱ्या दिवस अखेर भारताच्या खात्यात ६ सुवर्णांसह एकूण १० पदकांची भर पडली आहे. 

193
Shooting Asian Qualifiers : रुद्रांक्ष पाटील आणि मेहुली घोष यांना मिश्र दुहेरीत सुवर्ण
Shooting Asian Qualifiers : रुद्रांक्ष पाटील आणि मेहुली घोष यांना मिश्र दुहेरीत सुवर्ण
  • ऋजुता लुकतुके

रुद्रांक्ष पाटील (Rudrankksh Patil) आणि मेहुली घोष (Mehuli Ghosh) या भारताच्या जोडीने १० मीटर एअर रायफलच्या मिश्र दुहेरी स्पर्धेत भारताला सुवर्ण जिंकून दिलं. आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेतील यंदाचं भारताचं हे सहावं सुवर्ण ठरलं. चीनच्या शेन युफान आणि झू मिंगशुई या जोडीचा दोघांनी १६-१० असा पराभव केला. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवस अखेर भारताच्या खात्यात १० पदकांची भर पडली आहे. तर दोघांनी ऑलिम्पिक पात्रताही मिळवली आहे. (Shooting Asian Qualifiers)

भारताला ६ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्य पदकं मिळाली आहेत. त्यावरून भारताचं या स्पर्धेतील वर्चस्व दिसून येतं. (Shooting Asian Qualifiers)

रुद्रांक्ष (Rudrankksh Patil) आणि मेहुली (Mehuli Ghosh) प्राथमिक फेरीत दुसरे होते. दोघांचे मिळून ६३१.३ गुण झाले होते. तर युफान आणि मिंगशुई जोडीचे ६३२.३ इतके गुण होते. पण, अंतिम फेरीत भारतीय जोडीने चायनीज जोडीला मागे टाकलं. आणि अंतिम फरकही ६ गुणांचा म्हणजे तगडा होता. (Shooting Asian Qualifiers)

(हेही वाचा – Kia Sonet 2024 : किया सोनेट फेसलिफ्टचं भारतात बुकिंग सुरू)

१० मीटर एअर पिस्तुल प्रकारात मात्र भारताच्या अर्जुन चिमा आणि रिदम सांगवान या जोडीला चांगल्या सुरुवातीनंतरही रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. अंतिम फेरीत दोघांचा ११-१७ असा पराभव झाला. (Shooting Asian Qualifiers)

व्हिएतनामच्या थू विम थिम आणि क्वांग हू फाम या जोडीने प्राथमिक फेरीत मागे पडूनही अंतिम फेरीत हे अंतर भरून काढलं आणि भारतीय जोडीवर मात केली. प्राथमिक फेरीत भारतीय जोडीकडे ५८२ गुण होते. तर व्हिएतनामी जोडीकडे होते ५८० गुण. पण, अंतिम फेरीत सुरुवातीलाच झालेल्या चुकांमुळे आधी भारतीय जोडी ५-१५ अशी मागे पडली होती. पण, पुढच्या ३ फेऱ्यांमध्ये भारतीय जोडीने हा फरक थोडाफार भरुन काढला. आणि अखेर ११-१७ असा त्यांचा पराभव झाला. (Shooting Asian Qualifiers)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.