Shooting World Cup : नेमबाजी विश्वचषकात १० मीटर एअर रायफल प्रकारात रुद्रांक्ष पाटीलला सुवर्ण

Shooting World Cup : पॅरिस ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेत रुद्रांक्षची कामगिरी खालावली होती.

34
Shooting World Cup : नेमबाजी विश्वचषकात १० मीटर एअर रायफल प्रकारात रुद्रांक्ष पाटीलला सुवर्ण
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस ऑलिम्पिकसाठी खेळाडूंची निवड चाचणी झाली तेव्हा गेल्यावर्षी रुद्रांक्ष पाटीलला संदीप सिंगने अगदी थोडक्यात मागे टाकलं होतं. खरंतर पॅरिसचा पात्रता कोटा रुद्रांक्षनेच भारताला मिळवून दिला होता. पण, रायफल असोसिएशनच्या नियमानुसार, ऑलिम्पिकसाठीची निवड स्पर्धेतून होणार होती. नेमक्या या स्पर्धेत रुद्रांक्ष थोडक्यात मागे पडला. तरीही त्याच्या चेहऱ्यावर हसू कायम होतं. त्याने पराभव अतिशय उमदेपणाने स्वीकारला आणि इतकंच नाही तर हा पराभव आता त्याने मागे टाकलेलाही दिसतोय. ऑलिम्पिक नंतरच्या पहिल्याच नेमबाजी विश्वचषकात पुन्हा एकदा रुद्रांक्षने १० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्ण नावावर केलं आहे. (Shooting World Cup)

अंतिम फेरीत अगदी पहिल्या फैरीपासून रुद्रांक्षचं वर्चस्व दिसून आलं. भारताचा आणखी एक खेळाडू अर्जुन बबिताही अंतिम फेरीत होता. पण, तो सातवा आला. अंतिम फेरीत रुद्रांक्षचे गुण होते १५२.९ तर रौप्य जिंकलेल्या हंगेरीच्या इस्तवान मार्टन पेनीचे गुण होते २५१.७. यजमान अर्जेंटिनाचा मार्सेलो गुटिरेझ तिसरा आला. (Shooting World Cup)

(हेही वाचा – Waqf Amendment Bill : वक्फ कायद्यावरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गोंधळ)

२१ वर्षीय रुद्राक्षने अंतिम फेरीत १०.९ इतके गुण तब्बल तीनदा मिळवले. अंतिम फेरीत मिळू शकणारे हे सर्वोत्तम गुण आहेत. या कामगिरीमुळे तो खुश होता. ‘ऑलिम्पिकनंतरचा हा पहिला विश्वचषक आहे. त्यामुळे हंगामाची चांगली सुरुवात झाल्याचं समाधान मला आहे. बऱ्याच गोष्टी मनासारख्या घडल्या. आणि मी देशासाठी सुवर्ण जिंकू शकलो, याचा सगळ्यात जास्त आनंद आहे,’ असं रुद्राक्ष सामन्यानंतर म्हणाला. (Shooting World Cup)

२१ वर्षीय रुद्रांक्षने २०२२ मध्ये नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण जिंकून जगाचं लक्ष पहिल्यांदा आपल्याकडे वेधून घेतलं होतं. त्यानंतर त्याने कैरो इथं विश्वचषक सुवर्णही जिंकलं. २०२३ मध्येच तो १० मीटर एअर रायफल प्रकारात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला होता. सगळं मनासारखं घडत असताना अचानक पॅरिस ऑलिम्पिक निवड चाचणी स्पर्धेत मात्र रुद्रांक्षची कामगिरी अचानक घसरली. आता ते दु:ख मागे टाकून तो नवीन ऑलिम्पिक हंगामासाठी तयार होत आहे. (Shooting World Cup)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.