- ऋजुता लुकतुके
दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका खडतरच मानली जाते. आणि गोलंदाजांनी वर्चस्व गाजवल्याने झटपट फलंदाज बाद झाले तर कसोटी संपतेही पटापट, जसं या मालिकेचं झालं. सेंच्युरियनची पहिली कसोटी अडीच दिवसांत संपली. तर केपटाऊन कसोटी सव्वा दिवसांतच संपली. त्यामुळे माजी क्रिकेटपटू आणि जाणकारांमध्ये खेळपट्टीवरून चांगलीच चर्चा रंगली आहे. (Shortest Test Match)
त्यातच माजी इंग्लिश कर्णधार केविन पीटरसनची एक ट्विटर प्रतिक्रिया सगळ्याचं लक्ष वेधून घेत आहे. ‘मालिकेत तिसरा कसोटी सामना भरवण्यासाठी पुरेसा वेळ उरला आहे. केपटाऊनमध्येच तिसरी कसोटी भरवावी. त्यामुळे ही मालिकाही निकालात निघू शकेल,’ असं पीटरसनने ट्विटरवर लिहिलं आहे. (Shortest Test Match)
There’s enough time to play the 3rd and deciding Test match to start tomorrow in Cape Town.
There’ll absolutely be a result in the series and the players won’t miss their scheduled flights home. 🥳— Kevin Pietersen🦏 (@KP24) January 4, 2024
(हेही वाचा – Virat Kohli Bhangra : केपटाऊन कसोटीतील विजयानंतर विराट कोहलीचं भांगडा नृत्य)
सामन्यात द आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेतली. पण, मोहम्मद सिराजच्या १५ धावांत ६ बळींच्या कामगिरीमुळे भारताने आफ्रिकेचा पहिला डाव ५५ धावांत गुंडाळला. त्यानंतर भारताची पहिल्या डावात सुरुवात ४ बाद १५३ अशी झाली होती. पण, त्याचवेळी भारताचे पुढचे ६ फलंदाज शून्य धावात आणि ११ चेंडूत तंबूत परतले. आणि भारताकडे फक्त ९८ धावांची आघाडी राहिली. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेकडून एडन मार्करमने शतक झळकावलं खरं. पण, इतर फलंदाज बाद होत राहिले. आणि आफ्रिकन दुसरा डाव १७४ धावांत आटोपला. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी ७९ धावांचं लक्ष्य होतं, जे भारतीय संघाने ३ गडी गमावत पूर्ण केलं. (Shortest Test Match)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community