भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरला फेब्रुवारी 2022 साठी ‘आयसीसी प्लेयर्स ऑफ द मंथ’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. ही घोषणा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सोमवारी केली. श्रेयस अय्यरला गेल्या महिन्यात अनुक्रमे वेस्ट इंडिज आणि श्रीलंका विरुद्धच्या मालिकेदरम्यान केलेल्या चमकदार कामगिरीबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. या उजव्या हाताच्या फलंदाजाने अहमदाबादमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 80 धावा केल्या आणि त्यानंतर तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील अंतिम सामन्यात 16 चेंडूत 25 धावा केल्या.
धमाकेदार खेळी
श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याने आणखी चांगली कामगिरी केली. तीन डावांत 174.36 च्या प्रभावी स्ट्राइक-रेटने 204 धावा केल्या. त्याने तीन सामन्यांत 57 (28), 74 (44) आणि नाबाद 73 (45) धावा केल्या, तर मालिकेत सर्वोत्तम कामगिरी करताना त्याने 20 चौकार आणि 7 षटकार मारले.
अमेलिया केरने ही पटकावला पुरस्कार
न्यूझीलंडची अष्टपैलू खेळाडू अमेलिया केर हिला फेब्रुवारी 2022 साठी ‘आयसीसी प्लेयर्स ऑफ द मंथ’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. न्यूझीलंडची २१ वर्षीय अष्टपैलू खेळाडू अमेलिया केर ही प्लेअर ऑफ द मंथ ठरली आहे. टी-20 न्यूझीलंडला 18 धावांनी विजय मिळवून देताना, केरने 17 धावा केल्या आणि 25 धावा देत 2 बळी घेतले. अशी कामगिरी करत केरने स्वत:ला जागतिक दर्जाची क्रिकेटपटू म्हणून सिद्ध केले आहे.
( हेही वाचा: राज्यातील कुपोषणाचे ‘हे’ आहे मुख्य कारण- उच्च न्यायालय! )
श्रीलंकेवर दणदणीत विजय
बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सोमवारी खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी मालिकेच्या तिसऱ्या दिवशी भारताने श्रीलंकेचा 238 धावांनी पराभव केला. श्रीलंकेचा दुसरा डाव 208 धावांवर आटोपला. भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळलेली पहिली कसोटी मालिका 2-0 ने जिंकली आहे. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. तत्पूर्वी, चहापानाच्या विश्रांतीपर्यंत श्रीलंकेने 39 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात 151 धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवशी श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली होती.
Join Our WhatsApp Community