Shreyas Iyer : श्रेयस अय्यरचा यंदाच्या विश्वचषकातील सर्वात लांब षटकार पाहिला?

विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये काहीसा चाचपडणारा श्रेयस अय्यर बुधवारी घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध चमकून गेला.

184
Shreyas Iyer : पुन्हा तंदुरुस्त झालेला श्रेयस अय्यर रणजीच्या उपांत्य फेरीत खेळणार

ऋजुता लुकतुके

भारताचा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आतापर्यंत या विश्वचषकात मोठी खेळी खेळू शकला नव्हता. तसंच आखूड टप्प्याच्या चेंडूंवर बाद होत असल्यामुळे तो टीकेचा धनी झाला होता. तर संघ प्रशासनासाठी तो एक काळजीचा विषय होता. पण, श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर बुधवारी श्रेयसची बॅट परजली.

तो मैदानावर आला तेव्हा विराट आणि शुभमन ही जमलेली जोडी फुटली होती. आणि तिथून पुढे भारताला तीनशेच्या वर धावा करायच्या झाल्या तर एक बाजू लावून धरून वर तडाखेबाज फलंदाजी करणारा कुणीतरी खेळपट्टीवर उभा राहायला हवा होता. (Shreyas Iyer)

ती भूमिका श्रेयसने (Shreyas Iyer) बरहुकूम बजावली. आपल्या उंचीचा फायदा घेत जलदगती गोलंदाजांचे उसळलेले चेंडूही त्याने लिलया पूलचा फटका मारून सीमेपार धाडले. त्याने मारलेले दोन षटकार पार साईडस्क्रीनच्या पलीकडे गेले. आणि त्यातलाच एक षटकार या विश्वचषकातील सगळ्यात मोठा षटकार ठरला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

भारतीय डावातील ते ३६ वं षटक होतं. नुकताच विराट बाद झाल्यामुळे प्रेक्षकांमध्ये तशी शांतता होती. पण, श्रेयसने आधी दोन षटकार मारून त्याचा इरादा स्पष्ट केलेला होता. त्यातच कसून रजिथाचा एक चेंडू श्रेयसने (Shreyas Iyer) सरळ दिशेनं उंच टोलवला. चेंडू प्रेक्षकांच्या गॅलरीत पार दुसऱ्या मजल्यावर पडला. त्याने साईडस्क्रीनही ओलांडली होती. हा षटकार १२६ मीटर लांब गेला.

या स्पर्धेतील आतापर्यंतचा हा सगळ्यात मोठा षटकार ठरला आहे.

New Project 2023 11 03T090220.125

श्रेयसने (Shreyas Iyer) सामन्यात ६ षटकार आणि २ चौकारांच्या सहाय्याने ५६ चेंडूत ८६ धावा केल्या. आणि त्याचवेळी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांत त्याने दोन हजार धावांचा टप्पाही बुधवारी ओलांडला. आंतरराष्ट्रीय स्तरावर एकदिवसीय सामन्यांत आता श्रेयसने ३ शतकं आणि १३ अर्धशतकं केली आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.