-
ऋजुता लुकतुके
भारतीय संघाने मार्च २०२५ मध्ये चॅम्पियन्स करंडक (Champions Trophy) स्पर्धा जिंकली. यात श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) मधल्या फळीत केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा वाटा मोठा होता. या कामगिरीच्या जोरावर आता श्रेयसने मार्चसाठीच्या आयसीसी (ICC) सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळवलं आहे. हे नामांकन मिळवणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे. स्पर्धेत खेळलेल्या ३ सामन्यांत श्रेयसने ५७ धावांच्या सरासरीने १७३ धावा केल्या होत्या. धावांचा आकडा जितका महत्त्वाचा आहे, तितकंच या धावांचं मोलही भारतीय संघासाठी मोठं होतं. कारण, स्पर्धेदरम्यान दोनदा कठीण परिस्थितीतून श्रेयसने संघाला बाहेर काढलं. दडपणाच्या परिस्थितीतही शांत डोक्याने खेळ केला.
न्यूझीलंड (New Zealand) विरुद्धच्या सामन्यात भारताची सुरुवात खराब झालेली असताना श्रेयसने ७९ धावांची खेळी साकारली. आणि भारताला स्थैर्य मिळवून दिलं. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपान्त्य सामन्यातही त्याच्या ४५ धावांचा आधार भारतीय संघाला मिळाला. अंतिम सामन्यातही त्याने भक्कम फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं. तर अंतिम सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) झटपट बाद झाल्यावर कर्णधार रोहितला साथ देत त्याने मोलाच्या ४८ धावा केल्या होत्या.
(हेही वाचा – Nashik मध्ये गोदावरी नदी स्वच्छतेसाठी मनसेचे आंदोलन: मनसैनिक नदीपात्रात उतरले)
Two classy batting talents and a pacer on meteoric rise in contention for the ICC Men’s Player of the Month for March 2025 👀https://t.co/GiSvwAjd31
— ICC (@ICC) April 8, 2025
(हेही वाचा – वक्फ विधेयकाला विरोध करणाऱ्या उबाठाची विश्वासार्हता संपली; Sanjay Nirupam यांचा हल्लाबोल)
श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) गेल्यावर्षी बीसीसीआयने (BCCI) मध्यवर्ती करारांच्या यादीतून वगळलं होतं. आयपीएलपूर्वी (IPL) देशांतर्गत क्रिकेट सामन्याला दांडी मारल्याचा परिणाम त्याला भोगावा लागला होता. त्यानंतर फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करत श्रेयसने यंदा मध्यवर्ती करार पुन्हा मिळवला आहे. आणि ए श्रेणीत त्याची वर्णी लागली आहे. मधल्या फळीत फलंदाजी करून धावसंख्येला आकार देण्याची क्षमता, दडपणाखाली केलेला मजबूत खेळ आणि एकेरी-दुहेरी धावा पळण्याची हातोटी ही त्याची फलंदाजीची वैशिष्ट्य ठरली आहेत.
श्रेयसच्या बरोबरीने रचिन रवींद्र (Rachin Ravindra) आणि जेकब डफी (Jacob Duffy) या इतर दोन खेळाडूंनाही नामांकन मिळालं आहे. दोघांनीही चॅम्पियन्स स्पर्धेत न्यूझीलंडकडून चांगली कामगिरी केली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community