- ऋजुता लुकतुके
भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पाठदुखीमुळे त्याचा स्थानिक संघ मुंबईबरोबर रणजी करंडकाच्या उपउपांत्य सामन्यात खेळू शकणार नाही. मुंबईच्या बीकेसी मैदानावर २३ फेब्रुवारीपासून मुंबईचा मुकाबला बडोदे संघाविरुद्ध रंगणार आहे. या सामन्यात बडोद्याकडून हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्याही खेळणार नाहीत. (Shreyas Iyer)
इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत श्रेयसने (Shreyas Iyer) पाठदुखीची तक्रार केली होती. त्यानंतरच उर्वरित तीन कसोटी सामन्यांतून त्याला वगळण्यात आलं. तो खेळलेल्या पहिल्या २ कसोटींत चांगली सुरूवात मिळूनही श्रेयसला मोठी धावसंख्या रचता आली नव्हती. हैद्राबाद आणि विशाखापट्टणमच्या दोन्ही कसोटीतील दोन्ही डावांत तो ३५, १३, २७ आणि २९ धावांवर बाद झाला. (Shreyas Iyer)
🚨📰| Shreyas Iyer will miss Mumbai’s Ranji Trophy quarter-final against Baroda due to back trouble.
(TOI) pic.twitter.com/Buua5M3WLo
— KnightRidersXtra (@KRxtra) February 20, 2024
(हेही वाचा – Muslim : छत्रपती संभाजी नगरातून अटक केलेला महमंद झोएब खान करणार होता हिंदुत्ववादी नेत्यांवर हल्ले)
या खेळाडूनेही बडोद्याविरुद्धच्या सामन्यातून दुखापतीमुळे घेतली माघार
३० ते ४० मिनिटं फलंदाजी केल्यावर त्याची पाठ दुखते त्यामुळे पाठदुखीतून बरं होण्यासाठी त्याला विश्रांतीची गरज आहे, असं श्रेयसने बीसीसीआयलाही (BCCI) कळवलं होतं. आणि दुसऱ्या कसोटीनंतर मिळालेल्या १० दिवसांच्या सुटीत मुंबईचा साखळीतील शेवटचा रणजी सामनाही श्रेयस याच कारणामुळे खेळला नव्हता. आता उपउपांत्य सामन्यातूनही त्याने माघार घेतली आहे. मुंबईचा डावखुरा शैलीदार फलंदाज शिवम दुबेनंही बडोद्याविरुद्धच्या सामन्यातून दुखापतीमुळे माघार घेतली आहे. (Shreyas Iyer)
श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) बद्दल बोलायचं झाल्यास गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली होती. आणि ऑक्टोबर महिन्यात एकदिवसीय विश्वचषका दरम्यान तो भारतीय संघात (Indian team) परतला. या स्पर्धेत त्याने लागोपाठ २ शतकंही ठोकली होती. पण, इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत त्याची पाठदुखी पुन्हा बळावल्याचं समजतंय. (Shreyas Iyer)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community