-
ऋजुता लुकतुके
दुलिप करंडकात भारतीय अ आणि भारतीय ड संघादरम्यानच्या सामन्यात ड संघ १८३ धावांतच सर्वबाद झाला. पहिल्या डावात हा संघ १०७ धावांनी पिछाडीवर पडला. पण, सामन्यात एक मजेशीर प्रसंग ड संघाच्या फलंदाजीच्या वेळी आला. संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) फलंदाजीला आला तेव्हा संघाची अवस्था ४ बाद ५५ अशी होती. श्रेयस चक्क गॉगल घालून फलंदाजीला आला. त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष त्याच्याकडे गेलं. शेवटी ७ चेंडू खेळून काढत तो भोपळाही न फोडता बाद झाला. सोशल मीडियावर तर श्रेयसचा हा लुक चांगलाच व्हायरल झाला आहे.
Shreyas Iyer stepped up to bat today sporting sunglasses 😎, but unfortunately, he was dismissed for a duck after just seven balls in the Duleep Trophy ❌ pic.twitter.com/0KMHunS0O4
— Cricket Addictor (@AddictorCricket) September 13, 2024
Chasma pahin ke kaun khelta h re 🤨😂#earthquake #Shreyasiyer #DuleepTrophy pic.twitter.com/O9CJRiYd8Y
— अनुज यादव 🇮🇳 (@Hello_anuj) September 13, 2024
श्रेयसने चक्क काळ्या काचांचा गॉगल घातला होता. त्यातच तो शून्यावर बाद झाल्यामुळे तो भरपूर ट्रोल झाला. सामन्यातही त्याचा संघ फारसा प्रभाव दाखवू शकला नाहीए. श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) नाणेफेक जिंकून अ संघाला पहिली फलंदाजी दिली. शम्स मुलानी आणि तनुष कोटियन या मुंबईकर फलंदाजांच्या अर्धशतकांच्या जोरावर अ संघाने २९० धावा केल्या. आणि नेमका भारतीय ड संघ पहिल्या डावांत १८३ धावांमध्येच सर्वबाद झाला. देवदत्त पड्डिकलच्या (Devdutt Padikkal) ९२ धावांमुळे संघाने निदान दीडशे धावा केल्या. चार फलंदाज वगळता इतर सर्व फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले. त्यातच कर्णधार श्रेयस काळा चश्मा लावून आल्यामुळे सगळ्यांनी त्याची टर उडवली.
(हेही वाचा- यंदा शिवाजी पार्कवर Dasara Melava कुणाचा ?; कोणी केला सर्वप्रथम दावा…)
दुसऱ्या डावात मात्र श्रेयस तोच चश्मा लावून क्षेत्ररक्षण करत होता. यावेळी अ संघाच्या बिनबाद ११५ धावा झाल्या असताना श्रेयसने मयंक अगरवालला बाद करत संघाला पहिलं यश मिळवून दिलं. याही वेळी त्याने चश्मा घातला होता. पण, त्याचं कौतुक झालं. (Shreyas Iyer)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community