Shreyas Iyer : श्रेयस अय्यर मुंबईकडून रणजी करंडकाचा सामना खेळणार

अफगाणिस्तान विरुद्धच्या टी-२० मालिकेत श्रेयसचा भारतीय संघात समावेश नाही. त्यामुळे तो मुंबईकडून रणजी करंडकात खेळणार आहे.

169
Ind vs Eng Test Series : श्रेयस अय्यर उर्वरित तीनही कसोटींना मुकण्याची शक्यता
Ind vs Eng Test Series : श्रेयस अय्यर उर्वरित तीनही कसोटींना मुकण्याची शक्यता
  • ऋजुता लुकतुके

अफगाणिस्तान विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठीच्या संघातून मुंबईकर श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) वगळण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबईच्या रणजी करंडकातील दुसऱ्या सामन्यात आंध्रप्रदेश विरुद्ध तो खेळणार आहे. हा सामना १२ जानेवारीपासून मुंबईत वांद्रे-कुर्ला क्रीडा मैदानात होणार आहे. नुकत्याच दक्षिण आफ्रिकेत झालेल्या कसोटी मालिकेत श्रेयसची (Shreyas Iyer) कामगिरी साधारण होती. दोन्ही कसोटीत त्याने ३१,६ आणि ०, ४ अशा धावा केल्या.

‘श्रेयसने (Shreyas Iyer) मुंबई क्रिकेट असोसिएशनला पुढील रणजी सामना खेळण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यामुळे आंध्रप्रदेश विरुद्धच्या सामन्यासाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे,’ असं मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सूत्रांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं.

अफगाणिस्तान विरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर इंग्लंडचा संघ भारतात ५ कसोटी सामने खेळणार आहे. आणि या मालिकेची तयारी २९ वर्षीय श्रेयसला (Shreyas Iyer) करायची आहे, हे उघड आहे. इंग्लंड विरुद्धची पहिली कसोटी २५ जानेवारीपासून हैद्राबादला होणार आहे.

(हेही वाचा – Shortest Ever Test Match : केपटाऊनमधील खेळपट्टीवर आयसीसीचे ताशेरे)

श्रेयस (Shreyas Iyer) मुंबई संघात परतलाय तो सर्फराज खानच्या (Sarfaraz Khan) जागी. सर्फराज आणि तुषार देशपांडे (Tushar Deshpande) भारतीय ए संघाकडून इंग्लिश लायन्स संघाविरुद्ध कसोटी सामना खेळण्यासाठी अहमदाबादला रवाना झाले आहेत. मुंबईच्या संघात आंध्रप्रदेश विरुद्धच्या सामन्यासाठी सिल्वेस्टर डिसुझा आणि अमोघ भटकळ यांचा समावेश करण्यात आला आहे.

अमोघने अलीकडेच टाईम्स शिल्ड स्पर्धेत २६० धावांची खेळी केली होती. तर या हंगामात त्याने क्लब पातळीवर ६ शतकं ठोकली आहेत. या हंगामातील पहिल्या रणजी सामन्यात मुंबईने बिहारचा १ डाव आणि ५५ धावांनी पराभव केला होता. कर्णधार अजिंक्य रहाणे या सामन्यात मान अवधडल्यामुळे खेळू शकला नव्हता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.