भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्डकप २०२३ चा सामना धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खेळला जात आहे. शुभमन गिलने वनडे क्रिकेटच्या इतिहासात कोणालाही न जमलेला असा मोठा पराक्रम केला आहे. गिलने वनडे क्रिकेटमधील दोन हजार धावांचा टप्पा सर्वात कमी सामन्यात पूर्ण केल्या आहेत. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाज शुभमन गिलने मोठा विक्रम केलाय. धर्मशालेच्या स्टेडिअमवर खेळताना गिलने पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझमलाही मागे टाकले आहे. (World Cup 2023)
वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वेगाने हा टप्पा पार करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. आतापर्यंत हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या हाशीम आमलाच्या नावावर होता. त्याने ४० सामन्यात हा पराक्रम केला होता.
(हेही वाचा : World Cup 2023 : सामन्यापूर्वी केलेलं रोहितचे ‘ते’ विधान चर्चेत, काय म्हणाला रोहित शर्मा)
Fastest to 2⃣0⃣0⃣0⃣ runs in Men’s ODIs! 🔓
Congratulations Shubman Gill 👏👏 #TeamIndia | #CWC23 | #MenInBlue | #INDvNZ pic.twitter.com/meRzFIuV0y
— BCCI (@BCCI) October 22, 2023
शुबमन गिल याने २०१९ साली वर्ल्ड कपमध्ये पदार्पण केलं होतं. गिल२०२३ मध्ये चांगलाच फॉर्ममध्ये दिसला, गेल्या ३७ सामन्यांच्या ३७ डावांमध्ये ६४ च्या सरासरीने १९८६ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ६ शतके आणि १० अर्शतके केली असून एक डबल सेंच्युरीचाही यामध्ये समावेश आहे.एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २००० धावा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचा माजी दिग्गज झहीर अब्बास आहे. याचबरोबर इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसन, सध्याचा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेचा सध्याचा मधल्या फळीतील फलंदाज रॅसी वॅन डर डुसेन आहे. या सर्व फलंदाजांनी एकदिवशीय सामन्यात २ हजार धावा पूर्ण करण्यासाठी तब्बल ४५ डाव खेळले. परंतु शुबमन गिलला २ हजार धावा पूर्ण करण्यासाठी फक्त ३८ डाव खेळाव्या लागल्या.
Join Our WhatsApp Community