गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल सामना गुजरात संघाने दमदार विजय मिळवला. या सामना दरम्यान, शुबमन गिलने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर नवा पराक्रम केला आहे. शुबमन गिल आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही स्टेडियममध्ये सर्वात जलद १००० धावा करणारा भारतीय खेळाडू बनला आहे. (Shubman Gill)
हेही वाचा-शिवरायांचे सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त करणार : Eknath Shinde यांची ग्वाही
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी गुजरात संघाने चांगली सुरुवात केली. शुबमन गिलने (Shubman Gill) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ३२ धावा करताच १००० धावांचा टप्पा ओलांडला. त्याने फक्त २० व्या डावात ही कामगिरी केली. यासह, शुबमन गिल आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही स्टेडियममध्ये सर्वात जलद १००० धावा करणारा भारतीय खेळाडू बनला आहे. या बाबतीत, त्याने सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला आहे. ज्याने वानखेडे स्टेडियमवर हा पराक्रम करण्यासाठी ३१ डाव घेतले होते. गिलने केवळ २० डावांमध्ये ही कामगिरी केली. त्याच वेळी, एकाच आयपीएल ठिकाणी सर्वात जलद १००० धावा करण्याचा विश्वविक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात युनिव्हर्स बॉसने केवळ १९ डावांमध्ये ही कामगिरी केली होती. (Shubman Gill)
हेही वाचा- Todays Gold-Silver Price: गुढीपाढव्यानिमित्त सोन्याला झळाळी; काय आहे आजचा दर?
गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स त्यांचे पहिले सामने गमावल्यानंतर येथे पोहोचले आहेत. गुजरातला त्यांच्या पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जकडून पराभव पत्करावा लागला, तर एमआयला चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव पत्करावा लागला. दोन्ही संघ हा सामना जिंकून पॉइंट टेबलमध्ये विजयाचे खाते उघडण्यासाठी उत्सुक असतील. (Shubman Gill)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community