शुभमन गिलचे दमदार द्विशतक! १९ चौकार अन् ९ षटकारांसह २०८ धावांची खेळी

भारत विरुद्ध न्यूझीलंड या वनडे मालिकेला सुरूवात झालेली आहे. शुभमन गिलने पहिल्याच वनडे सामन्यात दमदार द्विशतक केले आहे. १९ चौकार आणि ९ षटकार ठोकत शुभमनने आपले द्विशतक साकारले. शुभमनने तब्बल २०८ धावा ठोकत एकहाती भारताचा ठाव सांभाळला. त्यामुळेच भारताने ३४९ धावांचा डोंगर उभारला.

( हेही वाचा : बेस्टमधून डिजिटल प्रवासासाठी नवा मार्ग! प्रिमियम सेवेला प्रवाशांची पसंती )

न्यूझीलंडसमोर ३५० धावांचे लक्ष्य 

शुभमन द्विशतक ठोकणारा चौथा भारतीय क्रिकेटपटू ठरला असून याआधी असा विक्रम सचिन, रोहित शर्मा, ईशान किशन यांच्या नावे नोंद आहे. शुभमनने १४९ चेंडूमध्ये १९ चौकार आणि ९ षटकार ठोकत द्विशतक पूर्ण केले. आता न्यूझीलंडच्या संघासमोर ३५० धावांचे लक्ष्य असणार आहे.

शुभमनने शतक पूर्ण करत एकदिवसीय सामन्यात १ हजार धावाही पूर्ण केल्या आहेत. त्याने केवळ १९ डावात हा टप्प गाठत विराट आणि शिखर धवन या दिग्गजांना मागे टाकले आहे. दुसरीकडे रोहितने एकदिवसीय सामन्यांच्या ७४ डावांत १२४ षटकार ठोकले आहेत. त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला मागे टाकले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here