- ऋजुता लुकतुके
भारतीय क्रिकेट संघातील प्रमुख खेळाडू शुभमन गिल (Shubman Gill) आणि गुजरात टायटन्सचे त्याचे ४ सहकारी क्रिकेटपटू यांना गुन्हे अन्वेषण अर्थात सीआयडीने चौकशीसाठी बोलावलं आहे. गुजरातमध्ये झालेला ४५० कोटी रुपयांचा हा चिटफंड घोटाळा आहे आणि कंपनीने गुंतवणुकदारांना आश्वासन दिल्याप्रमाणे व्याजाचे पैसे न दिल्यामुळे या कंपनीविरुद्ध तक्राक करण्यात आली होती. या फंडातील काही गुंतवणूक ही टायटन्स संघातील गिलसह आणखी ४ खेळाडूंना दिल्याचं चिट फंडाचे मालक भूपेंद्र जालाने म्हटलं आहे. त्यानंतर खेळाडूंना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. शुभमनसह (Shubman Gill) राहुल तेवाटिया, मोहीत शर्मा आणि साई सुदर्शन अशी इतर खेळाडूंची नावं आहेत.
पॉन्झी योजनेचा सूत्रधार भूपेंद्र सिंग जाला यांच्याकडे चौकशी केल्यानंतर खेळाडूंना समन्स बजावण्यात आले आहे. या खेळाडूंनी गुंतवलेले पैसे परत केले नसल्याची माहिती जाला यांनी सांगितले. सीआयडी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल टीम गुजरात टायटन्सचा कर्णधार गिल (Shubman Gill) याने १.९५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. इतर खेळाडूंनी खूपच कमी रक्कम गुंतवली होती. बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी गिल सध्या ऑस्ट्रेलियात असल्याने सीआयडी तो आल्यानंतर त्याची चौकशी करेल.
(हेही वाचा – Property Tax : मुंबई महापालिकेकडून ६८ टक्के मालमत्ता कराची वसुली)
या घोटाळ्यात मेहता यांचा सहभाग आढळून आल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सीआयडीने बँक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी टीम तैनात केली आहे आणि जाला यांचे एक अनधिकृत खातेही आहे. जे खातेपुस्तक जप्त करण्यात आले आहे. या संदर्भात सोमवारपासून ठिकठिकाणी छापेमारी सुरू आहे.
भूपेन्द्र सिंह जाला यांनी राजस्थानसह देशभरात आकर्षक गुंतवणूक योजनांचे जाळे पसरवले. कमी वेळीत जास्त व्याज देण्याचे आश्वासन देऊन पॉन्झी योजना सुरू केली. सुमारे १४ हजार लोकांनी या गुंतवणूक केली. ज्यामध्ये सीआयडीच्या प्राथमिक तपासात जाला यांनी ६००० कोटी रुपयांची मोठी फसवणूक केल्याची माहिती समोर आली. तपास जसजसा पुढे गेला तसतशी ही रक्कम ४५० कोटींवर आणल्याचे आढळून आले. याप्रकरणी छापेमारी सुरूच आहे. या घोटाळ्याची रक्कम ४५० कोटींहून अधिक असण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – Mumbai Goa Highway: जानेवारीच्या ‘या’ तारखेपासून पूर्ण क्षमतेने चालू होणार कशेडी बोगदा)
अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जाला यांची अनेक खाती आहे. त्या खात्यात सुमारे ५२ कोटी रुपयांच्या व्यवहारांची नोंद झाली आहे. सध्याच्या तपासाच्या आधारे घोटाळ्याची एकूण रक्कम ४५० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. छापेमारी सुरू राहिल्यास हे प्रमाण वाढू शकते. (Shubman Gill)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community