Shubman Gill : शुभमन गिल एकदिवसीय क्रमवारीत पोहोचला दुसऱ्या स्थानावर

Shubman Gill : पहिल्या दहांत चार भारतीय फलंदाज आहेत..

71
Shubman Gill : शुभमन गिल एकदिवसीय क्रमवारीत पोहोचला दुसऱ्या स्थानावर
Shubman Gill : शुभमन गिल एकदिवसीय क्रमवारीत पोहोचला दुसऱ्या स्थानावर
  • ऋजुता लुकतुके

भारतीय सलामीवीर शुभमन गिलने (Shubman Gill) आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे एकदिवसीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. ताज्या क्रमवारीत गिल तिसऱ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान गुरुवारी १३ फेब्रुवारी रोजी आयसीसीने (ICC) नवीन क्रमवारी जाहीर केली. यात शुभमन दुसऱ्या स्थानावर तर पाकिस्तानचा बाबर आझम (Babar Azam) पहिल्या स्थानावर आहे. बाबरपेक्षा शुभमनला फक्त ५ गुण कमी आहेत. शुभमन गिलने (Shubman Gill) इंग्लंडविरुद्ध ३ एकदिवसीय सामन्यांत एक शतक आणि दोन अर्धशतकांसह एकूण २५९ धावा केल्या.

फलंदाजी क्रमवारीत पहिल्या दहामध्ये चार भारतीय फलंदाज आहेत. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) तिसऱ्या तर विराट कोहली (Virat Kohli) सहाव्या स्थानावर आहेत.

(हेही वाचा – Manipur मध्ये CRPF जवानाने केली दोन सहकाऱ्यांची हत्या; स्वतःवरही झाडली गोळी, ८ जखमी)

गोलंदाजी आणि अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतही भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.

इंग्लंडविरुद्घच्या मालिकेचा फायदा गिलला मिळाला आहे. गिलचे रेटिंग गुण ७८१ इतके आहेत. तर अव्वल क्रमांकावर असलेल्या बाबर आझमचे गुण ७८६ इतके आहेत. नवीन आठवड्यात गिल बाबरला मागे टाकू शकतो. कारण, सध्या अहमदाबादमधील त्याचं शतक हे धरलेलं नाही.

(हेही वाचा – Manipur मध्ये राष्ट्रपती राजवट लागू)

गोलंदाजांच्या क्रमवारीत राशिद खान (Rashid Khan) अव्वल स्थानावर गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या दहांत दोन भारतीय आहेत, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज. कुलदीप ३ स्थानांनी खाली आला आहे. तर सिराजचीही ४ जागांची घसरण झाली आहे. या यादीत अफगाणिस्तानचा राशिद खान (Rashid Khan) अव्वल स्थानावर आहे. त्याचे सध्या ६६९ गुण आहेत.

अष्टपैलू खेळाडू क्रमवारीत १ भारतीय एकदिवसीय अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत पहिल्या पाचांमध्ये कोणताही बदल झाला नाही. अव्वल १० मध्ये फक्त एक भारतीय रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) समाविष्ट आहे. अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी अव्वल स्थानावर आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.