Shubman Gill : ‘शुभमन भविष्यात तीनही प्रकारात भारताचं नेतृत्व करू शकतो’

Shubman Gill : फलंदाजीचे माजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी शुभमन गिलची स्तुती केली आहे

143
Shubman Gill : शुभमन गिल पर्थमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध होणार?
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघ सध्या निदान टी-२० मध्ये स्थित्यंतरातून जातोय. रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि रवींद्र जडेजाचे (Ravindra Jadeja) बदली खेळाडू संघाला शोधायचे आहेत. अशावेळी सलामीची एक जागा शुभमन गिलने (Shubman Gill) पटकावलेली दिसतेय. आधीच्या झिम्बाब्वे (Zimbabwe) दौऱ्यात त्याने भारतीय संघाचं नेतृत्वही केलं. यात भारतीय संघाने टी-२० मालिका ४-१ ने जिंकली.

(हेही वाचा- Women’s Asia Cup 2024 : युएईवर मोठा विजय मिळवत भारताची उपान्त्य फेरीत धडक )

आता भारतीय संधाचे माजी फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड (Vikram Rathour) यांनी शुभमनची (Shubman Gill) पाठ थोपटली आहे. त्यांना त्याच्यामध्ये भारतीय संघाचा भविष्यातील कर्णधार दिसत आहे. शुभमनला पहिल्यांदा नेट्समध्ये फलंदाजी करताना पाहिलं, तो दिवसही राठोड यांना आठवतो. ‘भारतीय संघातील त्याचा पहिला दिवस होता. नेट्समध्ये मी त्याला पाहिलं, तेव्हा त्याच्याबद्दल जे ऐकलं होतं, ते सगळं क्षणार्धात आठवलं. त्याच्याकडे काहीतरी खास कौशल्य आहे, असंच मला अनेकांनी सांगितलं होतं. ते मला प्रत्यक्षात दिसलं,’ असं राठोड यांनी इंडियन एक्स्रेस वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

‘त्याला त्याची बलस्थानं माहीत होती. परिस्थितीनुरुप खेळण्याची कला त्याला तेव्हाच साधली होती,’ असं पुढे राठोड म्हणाले. (Shubman Gill)

(हेही वाचा- Vegetables Price Hike: सामन्यांच्या खिशाला कात्री; भाज्यांचे वाढले भाव, कडधान्ये ही कडाडली)

शुभमन गिलने (Shubman Gill) भारतीय संघात आल्या आल्याच आपलं कसब सिद्ध केलं आहे. मागच्या ४ वर्षांत आघाडीच्या फळीतील फलंदाज म्हणून नावही कमावलं आहे. २०२३ सालात एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने २३ सामन्यांत ६८ च्या सरासरीने १,५८४ धावा केल्या आहेत.

कप्तानी मिळाली तर त्याचा सर्वोत्तम खेळ तो पेश करेल असाही विश्वास राठोड यांनी व्यक्त केला आहे. ‘विराट आणि रोहित यांना कप्तानीने आत्मविश्वास दिला. त्यांचा वैयक्तिक खेळही कप्तानीनंतर आणखी बहरला. शुभमन त्यांच्या श्रेणीतील फलंदाज आहे. आव्हानं स्वीकारायला त्याला आवडतात. थोडी जास्तीची जबाबदारी त्याच्यावर आली तर तो फलंदाजीतही चांगलीच कामगिरी करेल,’ असा विश्वास विक्रम राठोड यांना वाटतो. (Shubman Gill)

(हेही वाचा- मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय; RSS-संघाच्या कार्यक्रमात सरकारी कर्मचारी होऊ शकतात सहभागी)

सध्या शुभमन गिल (Shubman Gill) एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा उपकप्तान आहे.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.