-
ऋजुता लुकतुके
एकदिवसीय क्रिकेटमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या शुभमन गिलने (Shubman Gill) फेब्रुवारी महिन्यातील आयसीसीचा सर्वोत्तम क्रिकेटपटू होण्याचा मान पटकावला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील शतक आणि पाठोपाठ चॅम्पियन्स करंडकात बांगलादेशविरुद्ध केलेल्या शतकामुळे शुभमनने ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ आणि न्यूझीलंडचा ग्लेन फिलीप यांना मागे टाकत हा किताब पटकावला आहे. फेब्रुवारी महिन्यातील ५ एकदिवसीय सामन्यांत शुभमनने (Shubman Gill) १०१ धावांच्या सरासरीने तब्बल ४०६ धावा जमा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत शुभमनने १ शतक आणि २ अर्धशतकं झळकावली होती. त्याच्या जोरावरच भारताने ही मालिका ३-० ने जिंकली आणि त्यानंतर चॅम्पियन्स कंरडकात त्याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली. इथंही बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने शतक झळकावलं. तर पाकिस्तानविरुद्धही विराटबरोबर महत्त्वपूर्ण शतकी भागिदारी करताना त्याने ४६ धावांचं योगदान दिलं होतं.
(हेही वाचा – Holi 2025 : धुलीवंदनासाठी नैसर्गिक रंगाचा वापर करा, होळीत टायर, प्लास्टिक जाळू नका; आयुक्तांचे आवाहन)
Say hello 👋 to the ICC Men’s Player of the Month of February 2025
Congratulations, Shubman Gill 👏 👏#TeamIndia pic.twitter.com/9evLDsvNSE
— BCCI (@BCCI) March 12, 2025
गिलने इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यांत नागपूरमध्ये ८७ धावा केल्या. त्यानंतर कटक इथं त्याने ६४ धावा केल्या. तर तिसऱ्या पुण्यातील एकदिवसीय सामन्यात त्याने १०२ चेंडूंत ११२ धावा केल्या होत्या. सातत्यपूर्ण कामगिरी आणि त्यानंतर आयसीसीकडून झालेल्या या गौरवाबद्दल शुभमनने (Shubman Gill) समाधान व्यक्त केलं आहे. ‘तुम्ही संघासाठी चांगली कामगिरी करू शकलात, तर त्याचं एक वेगळंच समाधान असतं आणि या कामगिरीचं असं कौतुक झालं तर होणारा आनंद वेगळाच असतो,’ असं गिलने बोलून दाखवलं आहे. गिल भारताच्या एकदिवसीय संघात आता चांगलाच स्थिरावला आहे. आणि चॅम्पियन्स करंडकात त्याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली.
(हेही वाचा – Maharashtra Temperature : उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण ! विदर्भात अनेक शहरांत पारा चाळिशीपार ; तुमच्या शहरात किती तापमान?)
चॅम्पियन्स करंडकातही शुभमन (Shubman Gill) फॉर्मात होता आणि पहिल्या बांगालदेशविरुद्घच्या सामन्यात त्याने १०१ धावांचं योगदान दिलं. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध त्याने ४६ धावा केल्या. तर संपूर्ण स्पर्धेत त्याने ५ सामन्यांत ४७ धावांच्या सरासरीने १८८ धावा केल्या. आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीतही शुभमन (Shubman Gill) सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या पाचांत शुभमनसह रोहित आणि विराट हे इतर दोन भारतीय आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community