-
ऋजुता लुकतुके
इंग्लंड आणि त्यानंतर बांगलादेश विरुद्ध लागोपाठ शतक आणि चॅम्पियन्स करंडकातही (Champions Trophy) सातत्यपूर्ण कामगिरी याच्या जोरावर भारताचा सलामीवीर शुभमन गिलला (Shubman Gill) फेब्रुवारी महिन्यातील आयसीसीचा (ICC) सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून नामांकन मिळालं आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ आणि न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्सही (Glenn Phillips) त्याच्याबरोबर आहेत. यातील एका खेळाडूची सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवड होईल. फेब्रुवारी महिन्यातील ५ एकदिवसीय सामन्यांमध्ये शुभमनने (Shubman Gill) १०१.५० च्या सरासरीने तब्बल ४०६ धावा जोडल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेटही ९४ धावांचा आहे.
चॅम्पियन्स करंडकापूर्वी भारतीय संघ इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका खेळला. आणि यात तीन सामन्यांमध्ये शुभमनने (Shubman Gill) २ अर्धशतकं आणि १ शतक झळकावलं होतं. पहिल्या नागपूर सामन्यांत त्याने ८७ धावा केल्या. त्यानंतर कटकमध्ये ६० आणि अहमदाबादमध्ये त्याने ११२ धावा केल्या होत्या. त्याचा हाच फॉर्म चॅम्पियन्स करंडकातही कायम राहिला. आणि बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या सामन्यांत त्याने १०१ धावा केल्या. तर पाकिस्तानविरुद्धही त्याने ४६ धावांची उपयुक्त खेळी साकारली.
ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथने (Steve Smith) फेब्रुवारी महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटींत १४१ आणि १३१ अशा धावा केल्या आहेत. पण, एकदिवसीय सामन्यांमध्ये मात्र त्याच्या धावा अनुक्रमे १२, २९, ५ आणि १९ अशा आहेत. चॅम्पियन्स करंडकात स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) आपली कामगिरी फारशी उंचावू शकलेला नाही. तर न्यूझीलंडचा ग्लेन फिलीप्सही (Glenn Phillips) सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. आणि त्याने पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ५ सामन्यांमध्ये २३६ धावा केल्या आहेत. यात त्याचा स्ट्राईक रेट १२४ धावांचा होता. लाहोरमध्ये पाकिस्तानविरुद्घ त्याने १०२ धावा केल्या होत्या.
आपला हाच फॉर्म त्याने चॅम्पियन्स करंडकातही (Champions Trophy) कायम ठेवला आहे. आणि पाकिस्तानविरुद्ध त्याने महत्त्वपूर्ण ६१ धावा केल्या. शिवाय मैदानातील त्याचं क्षेत्ररक्षणही प्रभावी ठरलं आहे. खासकरून विराट कोहलीचा साखळी सामन्यात त्याने टिपलेला झेल विशेष गाजला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community