न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात शुभमन गिलने शानदार शतक झळकावले. त्याने या सामन्यात 126 धावा केल्या. या शतकासह, खेळाच्या तिन्ही प्रकारांत शतक झळकावणारा गिल (Shubman Gill) हा पहिला फलंदाज ठरला आहे. क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत तिन्ही प्रकारात एकूण 22 फलंदाजांनी शतके झळकावली आहेत.
ख्रिस गेलनंतर खेळाच्या तिन्ही प्रकारात शतक झळकावणारा ब्रेंडन मॅकलम हा केवळ दुसरा फलंदाज ठरला. श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू महेला जयवर्धने सुरेश रैना खेळाच्या तिन्ही प्रकारात शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. सुरेश रैना, रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी आतापर्यंत तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके झळकावली आहेत.
(हेही वाचा – Jitendra Awhad यांच्या बंगल्यात बॉम्ब ? दोन दिवसांपुर्वीच केलं होतं सूचक ट्वीट )
गीलची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
शुभमन गिलने भारतीय संघाकडून आतापर्यंत 13 कसोटी, 21 एकदिवसीय आणि 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 32 च्या सरासरीने 736 धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 73.76 च्या सरासरीने 1,254 धावा केल्या आहेत. टी 20 मध्ये त्याने 40.40 आणि 165.57 च्या सरासरीने 202 धावा केल्या आहेत.
तीन प्रकारात शतक झळकवणारे खेळाडू…
१. क्रिस गेल (वेस्ट इंडिज)
२. ब्रेंडन मॅकलम (न्यूझीलंड)
३. महेला जयवर्धने (श्रीलंका)
४. सुरेश रैना (भारत)
५. तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका)
६. मार्टिन गुप्टिल (न्यूझीलंड)
७. अहमद शहजाद (पाकिस्तान)
८. फाफ डु प्लेसिस (दक्षिण आफ्रिका)
९. रोहित शर्मा (भारत)
१०. शेन वॉटसन (ऑस्ट्रेलिया)
११. तमीम इक्बाल (बांगलादेश)
१२. केएल राहुल (भारत)
१३. ग्लेन मॅकईलवेल (ऑस्ट्रेलिया)
१४. केविन ओ ‘ब्रायन (आयर्लंड)
१५. डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)
१६. हीटर नाईट (इंग्लंड)
१७. मोहम्मद रिझवान (पाकिस्तान)
१८. बाबर आझम (पाकिस्तान)
१९. जोस बटलर (इंग्लंड)
२०. डेविड मलान (इंग्लंड)
२१. विराट कोहली (भारत)
२२. शुभमन गिल (भारत)
हेही पहा –