Shubman Gill : शुभमन गिल पर्थमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध होणार?

Shubman Gill : भारताचे गोलंदाजीचे प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केलने शुभमन गिलच्या दुखापतीविषयी मोठा अपडेट दिला आहे. 

42
Shubman Gill : शुभमन गिल पर्थमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध होणार?
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाचे गोलंदाजीचे प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांनी मीडियाशी बोलताना आघाडीचा फलंदाज शुभमन गिलच्या तंदुरुस्तीविषयी महत्त्वाचा अपडेट दिला आहे. ‘शुभमनचं दुखरं बोट दिवसेंदिवस आणखी बरं होत आहे. त्याच्या संघातील समावेशाविषयीचा निर्णय कसोटीच्या दिवशी सकाळी घेण्यात घेईल,’ असं मॉर्केल यांनी बोलून दाखवलं आहे. शनिवारी १६ नोव्हेंबरला सिम्युलेशन सराव सामना खेळताना स्लिपमध्ये शुभमन गिलच्या बोटाला दुखापत झाली होती. (Shubman Gill)

(हेही वाचा – दापोलीतील साई रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशाविरोधातील याचिका Mumbai High Court कडून निकाली)

भारतीय संघासाठी हा धक्का होता. कारण, गिल चांगला खेळत होता. पहिल्या डावात त्याने २८ धावा केल्या. नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर गलीत झेल देऊन तो बाद झाला. पण, दुसऱ्या डावात तो ४२ धावांवर नाबाद होता. एकूणच या हंगामात गिलने १९ कसोटी डावांमध्ये ८०६ धावा केल्या आहेत. ४७ धावांच्या सरासरीने त्याने ३ शतकं आणि ३ अर्धशतकं ठोकली आहेत. अलीकडे गिलने तिसऱ्या क्रमांकावर खेळायला सुरुवात केली आहे आणि या क्रमांकावर त्याची सरासरी ४२ धावांची आहे. (Shubman Gill)

(हेही वाचा – Delhi Assembly Election चे बिगुल वाजले; आपची पहिली यादी जाहीर)

मॉर्केल यांनी मीडियाशी बोलताना मोहम्मद शमीच्या उपलब्धतेविषयीही भाष्य केलं. मोहम्मद शमी अलीकडेच बंगालकडून रणजी सामना खेळला आहे. मध्य प्रदेश विरुद्ध त्याने सामन्यात ७ बळी टिपले आहेत. तेव्हापासून बोर्डर-गावस्कर चषकात त्याला लगेच खेळवणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यावर मॉर्केल म्हणतो, ‘शमीवर आमचं जवळून लक्ष आहे. तो पुन्हा मैदानावर परतलाय यातच आम्ही सध्या खुश आहोत. तो वर्षभर स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेला नाही. त्यामुळे त्याच्याविषयीचा निर्णय जपून घ्यावा लागणार आहे. योग्य वेळी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतेल.’ शमी बंगालकडून सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धाही खेळणार आहे. (Shubman Gill)

(हेही वाचा – सत्ता स्थापनेसाठी अपक्ष उमेदवारांची गरज लागेल का? Devendra Fadnavis म्हणाले…)

भारतासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्घची ही मालिका महत्त्वाची आहे. घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून ०-३ अशी मात मिळाल्यामुळे आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतही भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर घसरला आहे आणि पहिल्या दोनांत राहण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्धची ही मालिका ४-० अशी निर्विवाद जिंकावी लागेल. (Shubman Gill)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.