-
ऋजुता लुकतुके
युवा शुभमन गिल यंदाच्या वर्षातील भारताचा सगळ्यात यशस्वी फलंदाज आहे. या विश्वचषकातही त्याने दोन दमदार अर्धशतकं केली आहेत. त्याने अलीकडे या कामगिरीसाठी युवराज सिंगचे आभार मानले आहेत. का ते बघूया… (Shubman Gill Thanks Yuvraj Singh)
युवराज सिंग तो खेळत असताना कधी गंभीर क्रिकेटपटू नव्हता. मैदानावर घाम गाळायचा आणि बाहेर मौज-मजा करायची असा त्याचा स्वभाव होता. पण, पंजाबमध्ये क्रिकेटबद्दल बोलणं सुरू झालं तर सगळे क्रिकेटपटू त्याचं नाव आवर्जून घेतात. तो व्यावसायिक प्रशिक्षकही नाही. पण, त्याने दिलेला सल्ला ज्यांनी ऐकला त्यांचं भलंच झालंय. (Shubman Gill Thanks Yuvraj Singh)
याचं ताजं उदाहरण आहे शुभमन गिल. असं युवराजने काय केलं? आणि शुभमनला कशात मदत केली? (Shubman Gill Thanks Yuvraj Singh)
कोव्हिडच्या काळात युवराजने स्वत: पुढाकार घेऊन शुभमन आणि आणखी चार पंजाबच्या क्रिकेटपटूंना सरावासाठी बोलावलं. पाच आठवडे शुभमन गिल, अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंग आणि प्रभसिमरन सिंग यांनी युवराजबरोबर सराव केला आणि त्याचं फळं या सगळ्यांना आज मिळतायत. (Shubman Gill Thanks Yuvraj Singh)
(हेही वाचा – World Cup 2023: तिकिटांची काळाबाजारात विक्री केल्याबाबत कोलकाता पोलिसांत तक्रार)
शुभमन आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजतोय. तर अभिषेक हा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावतोय. आगामी काळात त्याची निवड पक्की मानली जातेय. ‘युवराजच्या घरी ३५ दिवस राहणं हा आमच्या सगळ्यांसाठीच आयुष्य बदलणारा काळ ठरला. क्रिकेटकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोनच बदलला. तो कोव्हिडचा काळ होता, त्यामुळे बराचसा सराव निर्बंध पाळून आणि बंद दरवाज्यात झाला. पण, युवराजसारख्या खेळाडूने उच्च स्तरावर क्रिकेट खेळण्यासाठी आम्हाला तयार केलं,’ असं अभिषेकने नुकतंच पीटीआयशी बोलताना सांगितलं. (Shubman Gill Thanks Yuvraj Singh)
युवराजबरोबरच्या या अनधिकृत शिबिरापूर्वीच शुभमन गिल भारतीय संघात दाखल झाला होता. पण, त्यानंतर त्याने तीनही प्रकारात आपली संघातील जागा निश्चित केली. तर अभिषेक शर्माने मागची दोन वर्षं पंजाब आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या संघांसाठी मजबूत कामगिरी केली आहे. प्रभसिमरन हा होआंगझाओमध्ये आशियाई क्रीडास्पर्धेत सुवर्ण जिंकलेल्या संघाचा सदस्य होता. (Shubman Gill Thanks Yuvraj Singh)
थोडक्यात, युवराजच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांनीच आपला खेळ उंचावला आहे. युवराजने केव्हिडचे ते ३५ दिवस या खेळाडूंबरोबर फक्त धालवले नाहीत, तर दिवस-रात्र त्यांच्याबरोबर क्रिकेटवर चर्चा केली. म्हणूनच शुभमनने पहिलं आंतरराष्ट्रीय शतक केलं तेव्हा आणि आताही त्याने वारंवार युवी पा यांचे आभार मानले आहेत. (Shubman Gill Thanks Yuvraj Singh)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community