Shubman Gill : शुभमन पाक विरुद्धच्या सामन्यापूर्वी अहमदाबादला पोहोचला तो क्षण 

सगळ्यात चांगली बातमी म्हणजे शुभमन गिल डेंग्यूतून सावरल्यानंतर आता अहमदाबादमध्ये पोहोचला आहे. अर्थात, तो पाकिस्तान विरुद्ध खेळेलच असं सांगता येणार नाही.

172
Shubman Gill : शुभमन गिलसह गुजरात टायटन्सच्या ४ खेळाडूंना पोलिसांचं समन्स

ऋजुता लुकतुके

भारतीय क्रिकेट चाहत्यांना बुधवारी संध्याकाळी एक खुशखबर मिळाली. डेंग्यूतून सावरलेला युवा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) पाकिस्तान विरुद्धच्या प्रतिष्ठेच्या सामन्यापूर्वी संघात दाखल झाला. आतापर्यंत तो चेन्नईतील हॉटेलमध्येच विश्रांती घेत होता. अर्थात, अजून तो पाकिस्तान विरुद्ध खेळेल की नाही हे अजिबात स्पष्ट नाही.

(हेही वाचा-Israel Palestine Conflict : ‘ऑपरेशन अजय’च्या माध्यमातून इस्रायलमधील भारतीयांची सुटका होणार)

विश्वचषकाच्या सुरुवातीलाच झालेल्या डेंग्यूच्या संसर्गामुळे शुभमन (Shubman Gill) ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या दोन्ही सामन्यांना मुकला होता. बुधवारी तो अहमदाबादमध्ये दाखल झाला तेव्हा अनेकांनी त्याचा व्हीडिओ घेतला. आणि असे व्हीडिओ सोशल मीडियावर सध्या फिरत आहेत. अशाच एका व्हीडिओत लोक त्याला १४ तारखेच्या सामन्यात खेळणार का, असाही प्रश्न विचारताना दिसतात. पण, शुभमनने मौनच बाळगणं पसंत केलंय.

गिलच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ६ गडी राखून पराभव केला. तर अफगाणिस्तानलाही त्यांनी ८ गडी राखून हरवलं. आता पाकिस्तान बरोबरचा सामना येत्या १४ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर होणार आहे.

भारतीय संघ सध्या गुणतालिकेत २ सामन्यांतून ४ गुण मिळवत दुसऱ्या स्थानावर आहे. संघाची धाव सरासरी १.५००० इतकी आहे. शुभमन गिल पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याशिवाय त्याला खेळवणार नाही, अशी भूमिका यापूर्वी कर्णधार रोहीत शर्माने व्यक्त केली आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.