- ऋजुता लुकतुके
शुभमन गिल आता गुजरात जायंट्स संघाचा कर्णधार आहे आणि दोघं आयपीएलमध्ये एकत्र खेळताना दिसणार आहेत. (Shubman Meets Rashid Khan)
भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिलने नुकतीच लंडनमध्ये गुजरात टायटन्स संघातील आपला सहकारी राशिद खानची लंडनमध्ये भेट घेतली. या भेटीचा राशिद खानलाही आनंद झाला आणि त्याने भेटीचा फोटो सोशल मीडिया साईट ट्विटरवर शेअर केला आहे. (Shubman Meets Rashid Khan)
अलीकडेच हार्दिक पांड्याने आश्चर्यकारकरित्या मुंबई इंडियन्स संघात घरवापसी केल्यानंतर गुजरात टायटन्सच्या संघाची धुरा शुभमन गिलकडे देण्यात आली आहे आणि गिल लंडनमध्ये आला असता त्याने संघ सहकारी राशिक खानची आवर्जून भेट घेतली. (Shubman Meets Rashid Khan)
‘मला भेटायला आल्याबद्दल धन्यवाद, कॅप्टनसाहेब!’ असं राशिद खानने आपल्या ट्विटर पोस्टवर लिहिलं आहे.
Thank you for stopping by captain sahab 😊 @ShubmanGill ❤️ pic.twitter.com/txToATuCDq
— Rashid Khan (@rashidkhan_19) December 6, 2023
(हेही वाचा – WPL Auction 2024 : महिलांच्या आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव कधी, कुठे होणार?)
राशिदवर अलीकडेच लंडनमध्ये पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तो तिथे विश्रांती घेत आहे. तर शुभमन गिल सुट्टीसाठी लंडनमध्ये गेला आहे. तेव्हा दोघांची ही भेट झाली. राशिद खानने पोस्ट केलेला हा फोटो गुजरात टायटन्स संघानेही ट्विट केला आहे आणि त्यावर, ‘कॅप्टन गिल, मेंडिंग दिल (कर्णधार शुभमन गिल ह्रदय जोडताना),’ असं कॅप्शन दिलं आहे. (Shubman Meets Rashid Khan)
Captain Gill mending Dil ❣️
[📸 Rashid Khan/ IG] pic.twitter.com/7eqghU4Ubt
— Gujarat Titans (@gujarat_titans) December 6, 2023
राशिद खान एकदिवसीय विश्वचषकात अफगाणिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू ठरला होता आणि संघाने पाकिस्तान, इंग्लंडच्या केलेल्या पराभवात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. पाठीच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियातील बिगबॅश लीगमध्ये तो खेळू शकला नाहीए. तर शुभमन गिल २०२३ मध्ये भारतातर्फे सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा फलंदाज ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेत शुभमन खेळणार आहे. (Shubman Meets Rashid Khan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community