Sikandar Raza : झिंबाब्वेच्या सिकंदर रझाच्या ३३ चेंडूतच ११८ धावा; झिंबाब्वेनं २० षटकांतच केल्या ३४४ धावा

Sikandar Raza : रझाने या डावात तब्बल १५ षटकार ठोकले 

150
Sikandar Raza : झिंबाब्वेच्या सिकंदर रझाच्या ३३ चेंडूतच ११८ धावा; झिंबाब्वेनं २० षटकांतच केल्या ३४४ धावा
Sikandar Raza : झिंबाब्वेच्या सिकंदर रझाच्या ३३ चेंडूतच ११८ धावा; झिंबाब्वेनं २० षटकांतच केल्या ३४४ धावा
  • ऋजुता लुकतुके 

टी-२० क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाजीचे सगळे विक्रम दिवसागणिक मोडीत निघत आहेत. फटकेबाज फलंदाजीची नवीन रुपं आणि प्रकार रोज आपल्यासमोर येत आहेत. झिंब्बाब्वेचा सिकंदर रझा या प्रकारातील नवीन रत्न ठरला आला. आयसीसीच्या टी-२० विश्वचषक पात्रता स्पर्धेत आफ्रिकन गटात त्याने गाम्बिया विरुद्ध शतक झळकावलं ते ३३ चेंडूंतच. एकूण ४३ चेंडूंत त्याने नाबाद १३३ धावा केल्या. यात तब्बल १५ षटकार ठोकले. त्याच्या या कामगिरीमुळेच झिंबाब्वेनं या सामन्यात ३४४ अशी तगडी धावसंख्या उभारली. सिकंदर आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून खेळतो. त्यामुळे पंजाब किंग्जनेही त्याचा विक्रम त्याला शुभेच्छा देऊन साजरा केला. (Sikandar Raza)

सिकंदर रझा टी२० मध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणारा फलंदाज बनला आहे. त्याने रोहीत शर्मा आणि डेव्हिड मिलरचा विक्रम तोडला. रोहित आणि मिलर या दोघांनी २०१७ मध्ये टी२० क्रिकेटमध्ये ३५ चेंडूत शतके झळकावण्याची किमया केली होती. (Sikandar Raza)

 टी-20 सामन्याच्या एका डावात सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज –

१८ – साहिल चौहान वि. सायप्रस, एपिस्कोपी, २०२४
१६ – हजरतुल्ला झाझाई विरुद्ध आयर्लंड, डेहराडून, २०१९
१६ – फिन ऍलन विरुद्ध पाकिस्तान, ड्युनेडिन, २०२४
१५ – सिकंदर रझा विरुद्ध गांबिया, नैरोबी, २०१४
१५ – झीशान कुकीखेल वि ऑस्ट्रिया, लोअर, ऑस्ट्रिया, २०२२

(हेही वाचा- सणासुदीच्या काळात Digital Payment फसवणुकीपासून वाचण्यासाठी NPCI ने दिली महत्त्वाची माहिती)

सिकंरद रझाच्या या कामगिरीमुळे झिंबाब्वेनं सांघिक विक्रमही मोडीत काढले. गांबियाविरुद्ध ४ बाद ३४४ धावा केल्या. नेपाळचा गेल्यावर्षीचा विक्रम त्यांनी मोडीत काढला. नेपाळने यापूर्वी टी२० क्रिकेटमध्ये पहिल्यांदा ३०० धावांचा टप्पा ओलांडला होता. झिम्बाब्वेसाठी कर्णधार सिकंदर रझाने ४३ चेंडूत १५ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने नाबाद १३३ धावा केल्या. फक्त षटकार आणि चौकारांच्या मदतीनेत त्याने २२ चेंडूंत ११८ धावा केल्या. सिकंदर सध्या झिंबाब्वे संघाचा कर्णधार आहे. आणि टी२० प्रकारात शतक झळकवणारा तो झिंबाब्वेचा पहिला खेळाडू आहे. (Sikandar Raza)

 टी२० मध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणारे फलंदाज 

सिकंदर रझा – ३३ चेंडू वि. गांबिया, २०२४
रोहीत शर्मा – श्रीलंका विरुद्ध ३५ चेंडू, २०१७
डेव्हिड मिलर – बांगलादेश विरुद्ध ३५ चेंडू, २०१७
जॉन्सन चार्ल्स – ३९ चेंडू विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २०२३
संजू सॅमसन – ४० चेंडू विरुद्ध बांगलादेश, २०२४

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.