-
ऋजुता लुकतुके
विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघाचा झालेला अनपेक्षित पराभव आणि अलीकडेच आयपीएलमध्ये पार पडलेलं एक ऑल कॅश डील याच्या पार्श्वभूमीवर संघातील एक प्रमुख खेळाडू जसप्रीत बुमराने केलेली एक पोस्टमुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. (Jasprit Bumrah Silence Post)
१९ नोव्हेंबरला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाकडून अनपेक्षित पराभव झाला आणि या दु:खातून भारतीय क्रिकेट चाहते अजून बाहेर आलेले नाहीत. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमरा हे संघातील वरिष्ठ खेळाडूही पराभवानंतर प्रतिक्रिया देणं टाळत आहेत. अशावेळी अचानक जसप्रीत बुमराने इन्स्टाग्राम खात्यावर एक स्टोरी शेअर केली आहे आणि या स्टोरीचा अर्थ लावताना चाहत्यांचीही दमछाक होतेय. (Jasprit Bumrah Silence Post)
फिकट राखाडी पार्श्वभूमीवर बुमराने फक्त ‘सायलन्स’ अशी अक्षरं लिहिली आहेत. पुढे लहान अक्षरात एक ओळ आहे, ‘कधीकधी शांत राहणं हेच खरं उत्तर असतं.’ ही स्टोरी त्याने नेमकी कुणाला उद्देशून लिहिली आहे, यावर मात्र चाहते वेगवेगळे तर्क लढवत आहेत. (Jasprit Bumrah Silence Post)
काहींच्या मते विश्वचषकातील अंतिम फेरीतील पराभवानंतर भारतीय संघावर टीका करणाऱ्यांना बुमराने दिलेलं हे उत्तर आहे. तर काहींनी याचा संबंध अलीकडेच आयपीएल संघात झालेल्या एका ऑल-कॅश डीलशीही जोडला आहे. (Jasprit Bumrah Silence Post)
आयपीएलमध्ये बुमरा मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे आणि मुंबई संघाने सोमवारीच गुजरात टायटन्सकडून हार्दिक पांड्याला विकत घेतल्याची घोषणा केली आहे. या निर्णयाच्या पाठोपाठ जसप्रीतने ही स्टोरी टाकल्यामुळे काहींच्या भुवया उंचवल्या आहेत. (Jasprit Bumrah Silence Post)
(हेही वाचा – Suicide : अग्निवीर तरुणीची प्रशिक्षणादरम्यान आत्महत्या)
बुमरा अशा गूढ पोस्ट फारशा टाकत नाही. आपले मित्र किंवा कुटुंबीयं यांच्या बरोबरचे आनंदी फोटो तो नेहमी इन्स्टाग्रामवर टाकतो. अशावेळी अचानक अशी पोस्ट टाकल्यामुळे मुंबई इंडियन्स संघात सगळं आलबेल नसल्याच्या चर्चाही काही ठिकाणी जोर धरू लागल्या आहेत. म्हणजेच हार्दिकच्या मुंबई संघातील पुनरागमनाविषयी बुमराची ही प्रतिक्रिया असल्याचा संबंध जोडला जातोय. (Jasprit Bumrah Silence Post)
इतकंच नाही तर विश्वचषक स्पर्धेनंतर संघातील वरिष्ठ खेळाडूंच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. वाढती वयं पाहता रोहित शर्मा, विराट कोहली, अश्विन, शामी हे खेळाडू आणखी किती काळ भारतीय संघात खेळू शकतील आणि त्यांनी टी-२० प्रकारात खेळावं का, अशाही चर्चा विश्वचषक स्पर्धेनंतर रंगल्या होत्या. त्यालाही बुमराने हे उत्तर दिल्याचा काहींचा अंदाज आहे. पण, एकंदरीत बुमराच्या या इन्स्टा स्टोरीनंतर क्रिकेट विश्वात चर्चेला उधाण आलं आहे. (Jasprit Bumrah Silence Post)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community