मेक्सिको लिओन येथे सुरू असलेल्या जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत आकांक्षा व्यवहारेने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आकांक्षाने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 40 किलो वजनी गटात भारतासाठी 59 किलो स्नॅच व 68 किलो क्लिन जर्क असे 127 किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले. मनमाडच्या क्रीडा इतिहासात जागतिक युथ वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक पटकावणारी आकांक्षा पहिलीच खेळाडू ठरली आहे. कझाकीस्थान व कोलंबिया च्या खेळाडूंशी कडवी लढत देत असतांना आकांक्षाचे सुवर्णपदक अवघ्या एक किलोने हुकले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक
गेल्या दोन महिन्यांपासून भारतीय क्रीडा प्राधिकरण पतियाळा येथे भारतीय संघाचे प्रशिक्षण शिबिरातसुद्धा आकांक्षाने जिद्द व मेहनतीच्या जोरावर उत्तम कामगिरी बजावली होती आकांक्षा सध्या गुरू गोविंद सिंग हायस्कुल मनमाड येथे इ 10 वी शिकत आहे. 59 किलो स्नॅचचा तिसरा प्रयत्न आकांक्षाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक मिळवून देणारा ठरला. क्लिनजर्क मध्ये 68 किलोचा दुसरा यशस्वी प्रयत्न झाल्यानंतर 71 किलोचा तिसरा प्रयत्न अयशस्वी झाल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अतिशय कमी वयात जागतिक पातळीवर उत्तम कामगिरी करणारी आकांक्षा पुढील जागतिक स्पर्धेत नक्कीच सुवर्णपदक पटकविणार.
(हेही वाचा – पोईसर नदीकाठच्या ‘त्या’ हटवलेल्या झोपड्यांच्या जागी १५ दिवसांत उभी राहिली संरक्षक भिंत)
आकांक्षाला छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे, व भारतीय संघा बरोबर मेक्सिको येथे प्रशिक्षक म्हणून निवड झालेल्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील, मोहन अण्णा गायकवाड, डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी, छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर, अध्यक्ष पी जे दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ,मुख्याध्यापक आर एन थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे, पर्यवेक्षिका पोतदार एस एस, महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष संजय मिसर, सचिव प्रमोद चोळकर, भारतीय व महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघाचे उपाध्यक्ष संतोष सिंहासने, गुरू गोविंद सिंग हायस्कुलचे अध्यक्ष बाबा रणजित सिंग प्राचार्य सदाशिव सुतार यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
Join Our WhatsApp Community