स्मृतीनं पटकावला सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार, पुरुषांकडून मात्र निराशा! बघा यादी

123

भारतीय महिला क्रिकेटमधील स्टार खेळाडू स्मृती मंधानाने आयसीसीचा सर्वोत्तम क्रिकेटपटू  पुरस्कार मिळवत भारताची शान राखली आहे. ज्या देशात पुरुष क्रिकेटला अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्या देशातील एकाही पुरुष क्रिकेटपटूला जे करता आले नाही, तो मान महाराष्ट्राच्या स्मृतीने मिळवला आहे.

याआधीही हा पुरस्कार पटकावला

आयसीसीकडून स्मृती मंधाना हिची 2021 मधील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार जिंकताना तिने टॅमी ब्यूमोंट (इंग्लंड), लिझेली ली (दक्षिण आफ्रिका) आणि गॅबी लुईस (आयर्लंड) या महिला क्रिकेटपटूंना मागे टाकले आहे. याआधीही स्मृतीने हा पुरस्कार पटकावला आहे. 2018 मध्ये तिने सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकला होता.स्मृती मंधाना हिची 2018 मधील सर्वोत्तम एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणूनही निवड करण्यात आली होती.

( हेही वाचा: विराट कोहलीच्या जागी मी असतो, तर लग्न केलं नसतं! असे का म्हणतो शोएब अख्तर? )

जगातील दुसरी महिला क्रिकेटपटू 

आयसीसीचा सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूसह सर्वोत्तम एकदिवसीय महिला क्रिकेटपटूचा मान संपादन करणारी स्मृती मंधाना ही जगातील दुसरीच महिला ठरली आहे. अशी कामगिरी ऑस्ट्रेलियाच्या एलीस पेरी हिलाच करता आली आहे. तसेच वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा मान स्मृती मंधाना हिच्याआधी झुलन गोस्वामी हिलाच मिळाला आहे.

पुरुषांकडून निराशा

एकीकडे स्मृती मंधाना भारतीय क्रिकेटची प्रतिष्ठा राखत असताना, टीम इंडियाच्या पुरुष संघाचा एकही खेळाडू पुरस्कार मिळवू शकला नाही. 2021 मध्ये आयसीसीच्या सर्वच स्पर्धांत भारतीय पुरुष खेळाडू वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करु शकले नाहीत.

आयसीसी पुरस्कार विजेत्यांची यादी

  • सर्वोत्तम क्रिकेटपटू (पुरुष) – शाहीन आफ्रिदी (पाकिस्तान)
  • सर्वोत्तम क्रिकेटपटू (महिला)- स्मृती मंधाना (भारत)
  • सर्वोत्तम कसोटीपटू (पुरुष)- जो रुट ( इंग्लंड)
  • सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू (पुरुष)- बाबर आझम (पाकिस्तान)
  • सर्वोत्तम टी-20 खेळाडू (पुरुष)- मोहम्मद रिझवान (पाकिस्तान)
  • सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू (पुरुष)- जानेमन मलान (दक्षिण आफ्रिका)
  • टी-20 खेळाडू (महिला)- टॅमी ब्यूमोंट (इंग्लंड)
  • उद्योन्मुख खेळाडू (महिला)- फातिमा सना (पाकिस्तान)
  • सर्वोत्तम पंच – मरायस इरॅसमस
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.