कौतुकास्पद! सर्वोत्तम टी-20 खेळाडूचे नामांकन मिळवणारी ‘ही’ आहे एकमेव भारतीय क्रिकेटपटू

भारत महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मानधनाला आयसीसीच्या महिलांमधील 2021 या वर्षातील सर्वोत्तम टी-20 क्रिकेटपटू पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. ‘आयसीसी टी-20 प्लेअर ऑफ द इयर’ या पुरस्काराच्या नामांकनात भारताच्या स्मृती मानधनासह इंग्लंडची टॅमी ब्यूमाँट आणि नॅट शिव्हर तसेच आयर्लंडची गॅबी लेविस या अन्य क्रिकेटपटू स्पर्धेत आहेत.

स्मृती मानधनाची कामगिरी

स्मृतीने 2021 या वर्षात नऊ ट्वेन्टी-२० सामन्यांत 31.87 च्या सरासरीने दोन अर्धशतकांसह एकूण 255 धावा काढल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या दोन विजयांत स्मृतीने महत्त्वाची भूमिका बजावली. इंग्लंडमधील टी-20 मालिकेत स्मृतीने सर्वाधिक एकूण 119 धावा केल्या. याशिवाय ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही तिने अर्धशतक ठोकले. 2021च्या सर्वोत्तम पुरुष टी-20 क्रिकेटपटूसाठी बांगलादेशचा शाकिब अल हसन, पाकिस्तानचा बाबर आझम, दक्षिण आफ्रिकेचा जानेमन मलान आणि आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग हे स्पर्धेत आहेत.

( हेही वाचा: सिंधुदुर्गात आघाडीचो भोपळो फुटलो…)

आयर्लंडच्या गॅबी लुईसची कामगिरी

आयर्लंडच्या गॅबी लुईसने दहा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तिने 41 च्या सरासरीने 325 धावा केल्या आहेत. यादरम्यान तिने एक शतक आणि एक अर्धशतकदेखील झळकावले. या अप्रतिम फलंदाजीमुळे आयर्लंड संघाला २ मालिका जिंकण्यात यश आले होते. ती टी-20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी आयर्लंडची पहिली खेळाडू ठरली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here