India Vs South Africa 2nd T-20: चालू सामन्यात मैदानात आला साप आणि…

108

भारत आणि साऊथ आफ्रिकेदरम्यान रविवारी खेळवण्यात आलेल्या दुस-या टी-ट्वेंटी सामन्यात अचानक एका खास पाहुण्याची एंट्री झाली. या पाहुण्याच्या एंट्रीने मात्र खेळाडूंचे टेन्शन वाढवले.चालू सामन्यात अचानक साप शिरल्यामुळे खेळाडू आणि प्रेक्षकांचाही ताप वाढला.

काय झाले नेमके?

भारत आणि साऊथ आफ्रिकेदरम्यान रविवारी दुसरा टी-ट्वेंटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात साऊथ आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेले भारताचे सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा आणि के एल राहुल यांनी भारताला चांगली सुरुवात करुन दिली. दरम्यान सातव्या षटकांनंतर मैदानात एक धक्कादायक प्रकार पहायला मिळाला. आठवे षटक सुरू होण्याआधी मैदानात चक्क सापाचे आगमन झाले.

आला साप, वाढला ताप

के एल राहुलचे या सापाकडे लक्ष गेले आणि त्यानंतर काही वेळ सामना थांबवावा लागला. अखेर मैदान व्यवस्थापकांनी या सापाला बाहेर काढले आणि सामना पुन्हा सुरू झाला. पण काही काळासाठी या सापाने खेळाडूंचा ताप चांगलाच वाढवला. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे.

रोहितसाठी ऐतिहासिक सामना

दरम्यान, हा दुसरा टी-ट्वेंटी सामना हा रोहित शर्मासाठी विशेष आहे. रोहितच्या कारकिर्दीतील हा 400वा टी-ट्वेंटी सामना असून इतके टी-ट्वेंटी सामने खेळणारा रोहित हा पहिलाच भारतीय क्रिकेटपटू आहे. मात्र या सामन्यात रोहितचे अर्धशतक अवघ्या सात धावांनी हुकले. रोहितने 7 चौकार आणि एका षटकारासह 37 चेंडूत 43 धावा काढल्या. त्यानंतर केशव महाराजच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा झेलबाद झाला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.