BCCI बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! सौरव गांगुलीसह जय शाह पदावर राहणार कायम

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दोघेही पुढील तीन वर्ष बीसीसीआयमध्ये त्यांच्या पदावर राहू शकतात. बीसीसीआयच्या घटनेत सुधारणा करण्यासंदर्भातील याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. म्हणजेच बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह यांच्या कार्यकाळावर कोणतेही संकट नाही. त्यामुळे हे दोघेही आता सलग दोन टर्म आपापल्या पदावर राहणार आहेत.

न्यायालयाने काय म्हटले…

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, बीसीसीआयच्या एका टर्मनंतर कुलिंग ऑफ कालावधी आवश्यक नाही, परंतु तो दोन टर्मनंतर करावा लागेल. सौरव गांगुली आणि जय शाह येत्या तीन वर्षांसाठी त्यांच्या पदावर राहू शकतात हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून स्पष्ट झाले आहे. तर राज्य क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयच्या कार्यकाळाचा एकत्रित विचार केला जाणार नाही. अशावेळी एखादा अधिकारी राज्य क्रिकेटमध्ये सहा क्रिकेटमध्ये सहा वर्षांनंतर बीसीसीआयमध्ये सहा वर्षे सेवा देऊ शकतो. परंतु कोणत्याही एका संस्थेत सलग सहा वर्षांपेक्षा जास्त काम करू शकत नाही. सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तीन वर्षांचा कूलिंग ऑफ कालावधी आवश्यक असणार आहे.

(हेही वाचा – मुंबईतील झवेरी बाजारात ईडीची धाड, 92 किलो सोन्यासह 340 किलो चांदी जप्त)

बीसीसीआयची काय होती मागणी

बीसीसीआयने सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या अधिकाऱ्यांना सलग दोन टर्म चालू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली होती. राज्य क्रिकेट संघटनांमध्येही तीन वर्षांचा कूलिंग ऑफ कालवधी असल्याने बीसीसीआयमध्ये त्याच्या पदोन्नतीमध्ये अडचणी येत असल्याचे बोर्डाने म्हटले होते. यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना म्हटले की एका टर्मनंतर कुलिंग ऑफ पिरियडची गरज नाही, मात्र दोन टर्मनंतर तो करता येईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here