Sourav Ganguly : दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रशिक्षक म्हणून सौरव गांगुलीची गच्छंती, आता करणार हे काम 

Sourav Ganguly : दिल्लीने सौरव गांगुलीला २ वर्षं दिल्ली फ्रँचाईजीपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे

48
Sourav Ganguly : दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रशिक्षक म्हणून सौरव गांगुलीची गच्छंती, आता करणार हे काम 
Sourav Ganguly : दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रशिक्षक म्हणून सौरव गांगुलीची गच्छंती, आता करणार हे काम 
  • ऋजुता लुकतुके 

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) जेएसडब्ल्यू क्रीडा केंद्राचा क्रिकेट संचालक म्हणून काम बघणार आहे. जेएसडब्ल्यू हे दिल्ली कॅपिटल्स फ्रँचाईजीचे (Delhi Capitals Franchise) सहमालक आहेत. जेएसडब्ल्यू क्रीडा केंद्रात सौरव दिल्ली कॅपिटल्स संघ, डब्ल्यूपीएल लीगमधील महिलांचा संघ, प्रिटोरिया कॅपिटल्सचा संघ या सगळ्यावर आता सौरव गांगुलीचं लक्ष असेल. भारतातील दिल्ली कॅपिटल्सच्या महिला आणि पुरुष संघांची मालकी ही संयुक्तपणे जीएमआर आणि जेएसडब्ल्यूकडे आहे. तर प्रटोरिया कॅपिटल्स संघाची संपूर्ण मालकी जेएसडब्ल्यू स्पोर्ट्सकडे आहे.

(हेही वाचा- “उत्तर द्या ! नाहीतर पेंग्विनची काळजी करीत राणीच्या बागेत बसा”, Ashish Shelar यांच आदित्य ठाकरेंना प्रत्त्युत्तर)

‘जेएसडब्ल्यू स्पोर्ट्सच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व क्रिकेटच्या कारभारावर आता सौरव गांगुलीचं लक्ष असेल. आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्स संघाची जबाबदारी आता दुसऱ्यांवर सोपवण्यात येईल,’ असं जेएसडब्ल्यू स्पोर्ट्स कंपनीने प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. (Sourav Ganguly)

२०१९ मध्ये सौरव गांगुली दिल्ली संघाशी सल्लागार म्हणून जोडला गेला. रिकी पाँटिंग सह तो संघावर काम करत होता. त्यानंतर २ वर्षं तो बीसीसीआयचा अध्यक्ष होता. या विश्रांतीनंतर पुन्हा तो दिल्लीकडे क्रिकेट संचालक म्हणून परतला. (Sourav Ganguly)

(हेही वाचा- Vidhansabha Election 2024: निवडणूक आचारसंहितेतही मिळणार आनंदाचा शिधा, राजकीय फोटो नसलेल्या किटचे होणार वाटप)

पण, मध्यंतरी जेएसडब्ल्यू आणि जीएमआर या दोन मालकांमध्ये एक करार झाला आहे. त्यानुसार, दोन्ही कंपन्या प्रत्येकी दोन वर्षं संधाचा कारभार पाहतील. दोन वर्षांनंतर आळीपाळीने दोन्ही कंपन्या कारभार पाहत राहतील. आता संघाची धुरा जीएमआर कंपनीकडे जाणार आहे. त्यामुळे सौरव गांगुलीला सध्या जेएसडब्ल्यू कंपनीने आयपीएलपासून दूर ठेवलं आहे. (Sourav Ganguly)

संघाचा कारभार २०२५ आणि २६ मध्ये जीएमआरकडे जाईल. त्यांनी गुरुवारीच संघाचे नवीन प्रशिक्षक म्हणून हेमांग बदानीची नेमणूक केली आहे. तर क्रिकेट संचालक म्हणूनही वेणुगोपाळ रावची निवड करण्यात आली आहे. जेएसडब्ल्यू स्पोर्ट्सने मात्र सौरव गांगुलीला त्यांच्या उपक्रमांमध्ये महत्त्वांचं स्थान असल्याचा पुनरुच्चार केला आहे. (Sourav Ganguly)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.