अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशेष क्रिकेट सामना, सौरव गांगुली असणार कर्णधार

80

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशभरात अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या निमित्ताने कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर एका खास क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या सामन्यांत सौरव गांगुली कर्णधारपद सांभाळणार आहे. लिजेंड्स लीग क्रिकेटने (एलएलसी) शुक्रवारी या संदर्भात ट्वीट करून याची माहिती दिली आहे.

( हेही वाचा : Free Metro Travel : स्वातंत्र्यदिनी शालेय विद्यार्थ्यांना करता येणार मोफत मेट्रो प्रवास! )

बीसीसीआय अध्यक्ष तथा भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने कर्णधारपद सोडून आणि क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारून आता बराच काळ लोटला आहे. मात्र तो पुन्हा क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. सौरव हा या विशेष सामन्यांसाठी कर्णधार म्हणून पुन्हा एकदा मैदानावर उतरणार आहे.

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सामना

हा सामना लिजेंड्स लीग क्रिकेट अंतर्गत खेळवला जाईल. १६ सप्टेंबरपासून या लीगची सुरुवात होईल. पण त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच १५ सप्टेंबरला भारताचा संघ महाराजा संघाचा सामना इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या वर्ल्ड जायंट्स संघांसोबत होणार आहे. या सामन्यात १० देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत. ही संपूर्ण लीग २२ दिवस चालेल.

भारताचा महाराजा संघ : सौरव गांगुली (कॅप्टन), विरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफ, ए. बद्रीनाथ, प्रज्ञान ओझा, पार्थिव पटेल, युसूफ पठान, हरभजन सिंह, नमन ओझा, अशोक दिंडा, आरपी सिंह, अजय जडेजा, जोगिन्दर शर्मा, रीतिंदर सिंह सोढी आणि इरफान पठान

वर्ल्ड जायंट्स संघ : इयॉन मॉर्गन (कॅप्टन), हर्षल गिब्स, सनथ जयसूर्या, मॅट प्रायर, लेडंल सिमंस, जॅक कॅलिस, नाथन मॅकलम, जॉटी ऱ्होड्स, मशरफे मोर्तजा, असगर अफगान, मुथय्या मुरलीधरन, डेल स्टेन, हॅमिल्टन मसाकाद्जा, ब्रेट ली, केविन ओ’ब्रायन, दिनेश रामदीन, मिचेल जॉनसन.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.