टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) गाडीला अपघात झाला. गुरुवारी (20 फेब्रु.) संध्याकाळी उशिरा दुर्गापूर एक्सप्रेसवेवर (Durgapur Expressway) हा अपघात झाला आहे. ज्या वेळी हा अपघात झाला त्यावेळी सौरव गांगुली (Sourav Ganguly) एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कारने बर्दवानला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा-Mohammed Shami : २०० बळी घेत मोहम्मद शमीने या ऑस्ट्रेलियन गोलंदाजाला टाकलं मागे
सुदैवाने सौरव गांगुली (Sourav Ganguly) किंवा त्यांच्यासोबत ताफ्यात उपस्थित असलेल्या इतर कोणालाही दुखापत झाली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दंतनपूरजवळ (Dantanpur) माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीच्या ताफ्यासमोर अचानक एक ट्रक आला. समोरून येणाऱ्या ट्रकमुळे सौरव गांगुलीच्या ताफ्यातील वाहनांना अचानक ब्रेक लावावे लागले. त्यावेळी ताफ्यातील वाहने एकमेकांवर आदळली. (Sourav Ganguly)
हेही वाचा-परदेशात MBBS करायचं असेल तरी NEET आवश्यक; MCI च्या नियमावर ‘सुप्रीम’ शिक्कामोर्तब
एका कारची सौरव गांगुलीच्या कारशी टक्कर झाली. ही दुर्घटना घडली तेव्हा पाऊस पडत होता. वृत्तानुसार, सौरव गांगुलीच्या ताफ्यातील दोन वाहनांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघातानंतर सौरव गांगुलीला सुमारे 10 मिनिटे रस्त्यावर वाट पाहावी लागली. यानंतर तो दुसऱ्या गाडीने कार्यक्रमासाठी रवाना झाला. या घटनेत सौरव गांगुलीच्या गाडीचे कोणतेही नुकसान झाले नाही. या धडकेत ताफ्यातील दोन वाहनांचे नुकसान झालं आहे. (Sourav Ganguly)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community