स्पॅनिश टेनिस स्टार राफेल नदाल याला कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती त्याने स्वतः ट्विट करून दिली आहे. सध्या तो गृहविलगीकरणात असून त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
Hola a todos. Quería anunciaros que en mi regreso a casa tras disputar el torneo de Abu Dhabi, he dado positivo por COVID en la prueba PCR que se me ha realizado al llegar a España.
— Rafa Nadal (@RafaelNadal) December 20, 2021
ट्विटकरून दिली माहिती
अबु धाबी येथील स्पर्धेतून मायदेशी परतल्यानंतर कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यावेळी माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्याच्या घडीला थोडा थकवा जाणवत आहे. पण लवकरच बरा होऊन कोर्टवर परतेल. मी सध्या कठीण काळातून जात आहे, परंतु मला आशा आहे की मी हळूहळू बरा होईन. मी आता घरी परतलो आहे आणि माझ्या संपर्कात असलेल्यांना मला कोरोना संसर्ग झाल्याचे कळवले आहे. संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही नदालने ट्विटच्या माध्यमातून केले आहे.
(हेही वाचा- आता २२ डिसेंबरला होणार एसटी विलिनीकरणाची सुनावणी)
नदालचे पुन्हा एकदा कमबॅक
पाठीच्या दुखापतीमुळे नदाल जवळपास चार महिने टेनिस कोर्टपासून दूर होता. अबुधाबीतील स्पर्धेतून त्याने पुन्हा एकदा कोर्टवर कमबॅक केले होते. या स्पर्धेत त्याने सेमी फायनलपर्यंत धडक मारली.
Join Our WhatsApp Community