ऋजुता लुकतुके
भारतात आगामी ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेची ऑनलाईन तिकीट विक्री सुरू झाली आहे. त्याचवेळी बीसीसीआयने देशातील काही मान्यवरांना स्पर्धचें खास सुवर्ण तिकीट देऊन आमंत्रित करायचं ठरवलं आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मंगळवारी असंच एक सुवर्ण तिकीट बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांना त्यांच्या घरी जाऊन प्रदान केलं. बीसीसीआयने याविषयीचा फोटो ट्विटरवर टाकून अमिताभ यांना खास संदेशही लिहिला आहे.
‘देशाच्या सुवर्ण मोलाच्या मान्यवरांना सुवर्ण तिकीट!’ असा संदेश बीसीसीआयने लिहिला आहे.
Golden ticket for our golden icons!
BCCI Honorary Secretary @JayShah had the privilege of presenting our golden ticket to none other than the “Superstar of the Millennium,” Shri @SrBachchan.
A legendary actor and a devoted cricket enthusiast, Shri Bachchan’s unwavering support… pic.twitter.com/CKqKTsQG2F
— BCCI (@BCCI) September 5, 2023
‘अमिताभ बच्चन यांचं क्रिकेटवरील प्रेम सगळ्यांना ठाऊक आहे. त्यांचा पाठिंबा क्रिकेट आणि क्रिकेटपटूंना कायम असतो, आणि त्यांच्या सहवासाने भारतीय संघालाही कायम उभारी येते. अशा अमिताभ यांना एकदिवसीय विश्वचषकाचे आमंत्रण देताना आम्हाला आनंद होत आहे,’ असं बीसीसीआयने म्हटलं आहे. अमिताभ बच्चन यांच्यानंतर देशभरातील आणखी अनेक मान्यवरांना तसंच देशाबाहेरील मान्यवरांनाही स्पर्धेचं विशेष आमंत्रण देण्यात येणार आहे.
(हेही वाचा – Zika Virus : मुंबईकरांची चिंता वाढली, झिकाचा दुसरा रुग्ण आढळला; नागरिकांना आवाहन)
देशात हळू हळू एकदिवसीय विश्वचषकाचं वातावरण तयार होत आहे. अलीकडेच रविवारी स्पर्धेसाठीचा १५ जणांचा संघही जाहीर झाला आहे. संघात के एल राहुलने पुनरागमन केलं आहे. तर बाकी संघ हा अपेक्षेप्रमाणेच आहे.
स्पर्धेसाठीचा भारतीय संघ – रोहीत शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, के एल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमरा, महम्मद शामी व महम्मद सिराज.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community