मुंबईत २१ जानेवारी रोजी टाटा मॅरेथॉनचे (Tata Mumbai Marathon) आयोजन करण्यात आले होते. भल्या पहाटे या मॅरेथॉनमध्ये सर्व वयोगटातील नागरिक सहभागी झाले होते. ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या मॅरेथॉनमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील योग केंद्रातील ज्येष्ठ नागरिकांनी उत्फुर्तपणे सहभाग घेतला होता. यावेळी स्मारकातील योग केंद्रातील ज्येष्ठ नागरिकांनी स्मारकाचा बॅनर हाती घेतला होता. तसेच स्मारकाचा शेला परिधान केला होता.
Tata मारेथॉन ही मुंबईत दरवर्षी जानेवारीच्या तिसऱ्या रविवारी आयोजित केली जाते. त्यामध्ये सावरकर स्मारकाच्या वतीने योग केंद्रातील जेष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता. फुल मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, ड्रीम रन आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मॅरेथॉन अशा विविध गटामध्ये मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. त्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या मॅरेथॉनमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील योग केंद्रातील ४५ ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. त्यामध्ये सर्वाधिक ८४ वर्षांचे आणि सर्वात कमी ६० वर्षांचे नागरिक सहभागी होते. या मॅरेथॉनची (Tata Mumbai Marathon) सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून सुरुवात झाली, पुढे ती हुतात्मा चौक, मरीन लाईन तेथून मेट्रो चित्रपटगृहापर्यंत ही मॅरेथॉन समाप्त झाली. सकाळी ७.३५ वाजता ही मॅरेथॉन सुरु झाली. स्मारकाच्या गटातील सर्वानी पूर्णवेळ म्हणजे सकाळी ९ वाजेपर्यंत या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळी मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी हातामध्ये वीर सावरकर यांनी बनवलेला झेंडा हाती घेतला होता. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचा बॅनरही घेतला होता. स्मारकाच्या योगा केंद्राने प्रथमच या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. आत यापुढे दरवर्षी सहभाग घेणार आहे. योगा केंद्रामुळे सर्वांना आरोग्य स्वास्थ्य उत्तम लाभले, त्यामुळे या मॅरेथॉनमध्ये सहभागी होताना कुणालाही शारीरिक त्रास झाला नाही.
Join Our WhatsApp Community