-
ऋजुता लुकतुके
खेलरत्न तसंच राजीव गांधी हे सर्वोच्च क्रीडा पुरस्कार ठरवणाऱ्या बारा जणांच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे. (Sports Awards Selection Panel)
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार तसंच राजीव गांधी पुरस्कारासह महत्त्वाच्या क्रीडा पुरस्कारांसाठीची १२ जणांची निवड समिती क्रीडा मंत्रलयाकडून जाहीर करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए एम खानविलकर या समितीचे प्रमुख असतील. (Sports Awards Selection Panel)
याशिवाय या समितीत सहा आंतरराष्ट्रीय माजी क्रीडापटूही आहेत. हॉकीपटू धनराज पिल्ले (Hockey player Dhanraj Pillay), टेबलटेनिसपटू कमलेश मेहता (Table tennis player Kamlesh Mehta), मुष्टीयोद्धा अखिल कुमार (Boxer Akhil Kumar), महिला नेमबाज आणि सध्याची राष्ट्रीय प्रशिक्षक सीमा शिरुर (Seema Shirur), माजी क्रिकेटपटू अंजुम चोप्रा (Anjum Chopra), बॅडमिंटनपटू तृप्ती मुरगुंडे तसंच पॉवरलिफ्टर फरमान पाशा या खेळाडूंचा या समितीत समावेश आहे. (Sports Awards Selection Panel)
(हेही वाचा – Accident : हिमाचल मध्ये भीषण अपघात,सहा जणांचा मृत्यू सहा जखमी)
दैनिक जागरण वृत्तपत्राचे क्रीडा संपादक अभिषेक त्रिपाठी मीडियाचे प्रतिनिधी म्हणून या समितीत असतील. तर सरकारी यंत्रणांकडून साईचे महासंचालक संदीप प्रधान, क्रीडा मंत्रालयाचे सहसचिव प्रेमकुमार झा आणि ऑलिम्पिक पोडियम योजनेचे कार्यकारी अधिकारी पुष्पेंद्र गर्ग यांचाही समितीत समावेश आहे. (Sports Awards Selection Panel)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community