Sports Calendar 2025 : चॅम्पियन्स करंडक, महिला विश्वचषक आणि फिफा क्लब फुटबॉल विश्वचषक, नवीन वर्षातील क्रीडा मेजवानी

Sports Calendar 2025 : २०२५ चं क्रीडाविषयक कॅलेंडर समजून घेऊया.

42
Sports Calendar 2025 : चॅम्पियन्स करंडक, महिला विश्वचषक आणि फिफा क्लब फुटबॉल विश्वचषक, नवीन वर्षातील क्रीडा मेजवानी
  • ऋजुता लुकतुके

२०१५ मध्ये क्रीडा रसिकांना चॅम्पियन्स करंडक आणि महिलांचा एकदिवसीय विश्वचषक अशा दोन महत्त्वाच्या क्रिकेट स्पर्धा अनुभवायला मिळणार आहेत. तर या वर्षाच्या शेवटी इंग्लिश संघ ॲशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. याशिवाय फुटबॉलमध्ये फिफाचा क्लब स्तरावरील विश्वचषक होईल. आणि जानेवारीत खोखो स्पर्धेचाही पहिला वहिला विश्वचषक होणार आहे. (Sports Calendar 2025)

याखेरीज वर्षातील महत्त्वाच्या सगळ्या स्पर्धांचं वेळापत्रक समजून घेऊया,

जानेवारी २०२५

२८ डिसेंबर ते १ फेब्रुवारी – पुरुषांची हॉकी इंडिया लीग

१२ जानेवारी ते २६ जानेवारी – महिलांची हॉकी इंडिया लीग

१२ ते २६ जानेवारी – ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा

१३ ते १९ जानेवारी – खोखो विश्वचषक

१४ ते १९ जानवारी – इंडिया ओपन बॅडमिंटन

१८ जानेवारी ते २ फेब्रुवारी – १९ वर्षांखालील महिलांचा टी-२० विश्वचषक

फेब्रुवारी २०२५

७ ते १४ फेब्रुवारी – आशियाई हिवाळी क्रीडास्पर्धा

१५ फेब्रुवारी ते २९ जून – हॉकी प्रो लीग

१९ फेब्रुवारी ते ९ मार्च – आयसीसी चॅम्पियन्स करंडक

मार्च २०२५

१ ते १२ मार्च – राष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धा

१०-११ मार्च – जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा, चीन (रिले)

११ ते १६ मार्च – ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा

१४ मार्च ते २५ मे – इंडियन प्रिमिअर लीग

१४ ते १६ मार्च – ऑस्ट्रेलियन ग्रँडप्रिक्स, मेलबर्न (मोटरस्पोर्ट्स)

१६ मार्च – इंग्लिश लीग क्लब, अंतिम फेरी

२१ ते २३ मार्च – चायनीज ग्रँडप्रिक्स, शांघाय (मोटरस्पोर्ट्स)

(हेही वाचा – MHADA ची 2025 मध्ये बंपर लॉटरी; दक्षिण मुंबईसह ‘या’ ठिकाणी घेता येणार घरं )

एप्रिल २०२५

४ ते ६ एप्रिल – जापनीज ग्रँडप्रिक्स, सुझुका (मोटरस्पोर्ट्स)

४ ते १५ एप्रिल – राष्ट्रीय हॉकी पुरुषांची स्पर्धा

७ ते १३ एप्रिल – मास्टर्स गोल्फ

११ ते १३ एप्रिल – बाहरिन ग्रँडप्रिक्स, साखिर (मोटारस्पोर्ट्स)

१८ ते २० एप्रिल – सौदी अरेबिया ग्रँडप्रिक्स, जेदाह (मोटारस्पोर्ट्स)

१९ एप्रिल ते ५ मे – जागतिक स्नूकर अजिंक्यपद स्पर्धा

२७ एप्रिल – लंडन मॅरेथॉन (Sports Calendar 2025)

मे २०२५

२ ते ४ मे – मियामी ग्रँडप्रिक्स, मियामी (मोटारस्पोर्ट्स)

१५ ते १८ मे – पीजीए अजिंक्यपद, शार्लट (गोल्फ)

१६ ते १८ मे – इमोला ग्रँडप्रिक्स, इमोला (मोटारस्पोर्ट्स)

१७ ते २५ मे – जागतिक टेबलटेनिस अजिंक्यपद स्पर्धा

२१ मे – युरोपा लीग अंतिम फेरी, बिलबाओ

२३ ते २५ मे – मोनॅको ग्रँडप्रिक्स, मोनॅको (मोटारस्पोर्ट्स)

२४ मे – जर्मन कप अंतिम फेरी, बर्लिन (फुटबॉल)

२४ मे – फ्रेंच कप अंतिम फेरी, पॅरिस (फुटबॉल)

२४ मे – महिलांची चॅम्पियन्स लीग अंतिम फेरी (फुटबॉल)

२५ मे ते ७ जून – फ्रेंच ओपन टेनिस

२७ ते ३१ मे – ॲथलेटिक्स विश्व अजिंक्यपद स्पर्धा

२८ मे – युरोपा कॉन्फरन्स चषक अंतिम फेरी, रोकॉ (फुटबॉल)

३० मे ते १ जून – स्पॅनिस ग्रँडप्रिक्स, बार्सिलोना (मोटारस्पोर्ट्स)

३१ मे – चॅम्पियन्स लीग अंतिम फेरी, म्युनिच (फुटबॉल)

जून २०२५

४ ते ८ जून – युएफा नेशन्स लीग अंतिम फेरी (फुटबॉल)

५ ते २२ जून – एमबीए अंतिम फेरी (बास्केटबॉल)

११ ते १५ जून – आयसीसी कसोटी अजिंक्यपद अंतिम फेरी

१२ ते १५ जून – युएस ओपन गोल्फ

१३ ते १५ जून – कॅनडा ग्रँडप्रिक्स, माँट्रियाल (मोटारस्पोर्ट्स)

१४ जून ते १३ जुलै – फिफा क्लब विश्वचषक (फुटबॉल)

१४ जून ते ६ जुलै – कोनकाकॅफ गोल्ड कप (फुटबॉल)

२७ ते २९ जून – ऑस्ट्रेलियन ग्रँडप्रिक्स, स्पिलबर्ग (मोटारस्पोर्ट्स)

३० जून ते १३ जुलै – विम्बल्डन (Sports Calendar 2025)

(हेही वाचा – महाराष्ट्राचे पहिले एआय धोरण तयार करा; माहिती व तंत्रज्ञान मंत्री Ashish Shelar यांचे निर्देश)

जुलै २०२५

२ ते २७ जुलै – युएफा महिला युरोचषक (फुटबॉल)

४ ते ६ जून – ब्रिटिश ग्रँडप्रिक्स, सिल्व्हरस्टोन (मोटारस्पोर्ट्स)

५ ते २६ जुलै – सीएएफ महिला आफ्रिका कप ऑफ नेशन्स (फुटबॉल)

५ ते २९ जुलै – फिडे महिला विश्वचषक (बुद्धिबळ)

११ जुलै ते ३ ऑगस्ट – जागतिक ॲक्वेटिक अजिंक्यपद स्पर्धा

१२ जुलै ते २ ऑगस्ट – कोपा अमेरिका फेमेनिना (फुटबॉल)

१७ ते २० जुलै – द ओपन चॅम्पियनशिप, पोर्टट्रश (गोल्फ)

२५ ते २७ जुलै – बेल्जियन ग्रँडप्रिक्स, स्पा (मोटारस्पोर्ट्स)

ऑगस्ट २०२५

१ ते ३ ऑगस्ट – हंगेरियन ग्रँडप्रिक्स, बुडापेस्ट (मोटारस्पोर्ट्स)

७ ते १७ ऑगस्ट – जागतिक खेळ

१५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर – महिला क्रिकेट विश्वचषक, भारत

२५ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर – अमेरिकन ओपन टेनिस

२५ ते ३१ ऑगस्ट – जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा

२७, २८ ऑगस्ट – डायमंड्स लीग अंतिम फेरी, वेल्टक्लास (ॲथलेटिक्स)

२९ ते ३१ ऑगस्ट – डच ग्रँडप्रिक्स, झान्डवूर्ट (मोटारस्पोर्ट्स)

सप्टेंबर २०२५

५ ते १२ सप्टेंबर – जागतिक तिरंदाजी विश्वचषक स्पर्धा

५ ते ७ सप्टेंबर – इटालियन ग्रँडप्रिक्स, मोंझा (मोटारस्पोर्ट्स)

१३ ते २१ सप्टेंबर – जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा

१३ ते २१ सप्टेंबर – जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा

१९ ते २१ सप्टेंबर – अझरबैजान ग्रँडप्रिक्स, बाकू (मोटारस्पोर्ट्स)

२५ ते २८ सप्टेंबर – रायडर चषक, अमेरिका (गोल्फ)

२७ सप्टेंबर ते १९ ऑक्टोबर – फिफा १९ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक (Sports Calendar 2025)

(हेही वाचा – Gas Cylinder Price : नवीन वर्षाच्या सुरूवातीला ‘कमर्शिअल गॅस सिलेंडर’च्या दरात कपात)

ऑक्टोबर २०२५

१ ते १० ऑक्टोबर – जागतिक भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धा, फोर्डे (नॉर्वे)

३ ते ५ ऑक्टोबर – सिंगापूर ग्रँडप्रिक्स, सिंगापूर (मोटारस्पोर्ट्स)

१३ ते १९ ऑक्टोबर – जागतिक बॅडमिंटन ज्युनिअर अजिंक्यपद स्पर्धा

१७ ते १९ ऑक्टोबर – युएस ग्रँडप्रिक्स, ऑस्टिन (मोटारस्पोर्ट्स)

१९ ते २५ ऑक्टोबर – जागतिक आर्टिस्टिक जिमनॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धा

२४ ते २६ ऑक्टोबर – मेक्सिको ग्रँडप्रिक्स, मेक्सिकोसिटी (मोटारस्पोर्ट्स)

नोव्हेंबर २०२५

जागतिक बॉक्सिंग, नवी दिल्ली (तारखा अनिश्चित)

६ ते १६ नोव्हेंबर – जागतिक रायफल व पिस्तुल अजिंक्यपद स्पर्धा, कैरो (नेमबाजी)

७ ते ९ नोव्हेंबर – ब्राझिलियन ग्रँडप्रिक्स, साओ पाओलो (मोटारस्पोर्ट्स)

१५ ते २६ नोव्हेंबर – कर्णबधिरांचं ऑलिम्पिक

२० ते २२ नोव्हेंबर – लास व्हेगास ग्रँडप्रिक्स, लास व्हेगास (मोटारस्पोर्ट्स)

२५ ते ३० नोव्हेंबर – सय्यद मोदी बॅडमिंटन, लखनौ

२८ ते ३० नोव्हेंबर – कतार ग्रँडप्रिक्स, लुसेल (मोटारस्पोर्ट्स)

डिसेंबर २०२५

पुरुषांचा ज्युनिअर हॉकी विश्वचषक (तारखा अनिश्चित)

५ ते ७ डिसेंबर – आबूधाबी ग्रँडप्रिक्स, यास मरिना (मोटारस्पोर्ट्स)

१० ते १४ डिसेंबर – बॅडमिंटन अजिंक्यपद अंतिम फेरी, चीन

२१ डिसेंबर ते १८ जानेवारी – आफ्रिका कप ऑफ नेशन्स (फुटबॉल)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.