कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या कालावधीमध्ये सर्वच क्रीडा स्पर्धा बंद झाल्या होत्या, अशा परिस्थितीमध्ये सुमारे अडीच वर्षानंतर एज्युकल स्पोर्ट्स फाऊंडेशनतर्फे (EduCul Sports Foundation) बॅडमिंटनच्या खेळाच्या स्पर्धा २२ जून २०२२ ते २६ जून २०२२ या कालावधीत महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या अधिपत्याखाली आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेचा अंतिम सोहळा रविवार, २६ जून २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित केला आहे.
या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला आणि एकूण ८०४ स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये नोंदणी केली आहे. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे प्रेसिडेंट अरूण लखानी यांनी या स्पर्धेकरता विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. २२ जून २०२२ रोजी सकाळी १० वाजता या स्पर्धेचे उद्घाटन जुहू जिमखाना या ठिकाणी भाजपाचे आमदार पराग अळवणी आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील खालील नामांकन प्राप्त खेळाडू भाग घेत आहेत. स्पर्धेमध्ये रोख बक्षीस मोठ्या प्रमाणात देण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धक मुंबईत दाखल झालेले आहेत. स्पर्धेचा प्रतिसाद लक्षात घेऊन आयोजकांनी ही स्पर्धा ३ ठिकाणी मिळून ८ बॅडमिंटन कोर्टवर एकाचवेळी आयोजित केली आहे.
(हेही वाचा Hindusthan Post Impact : महाविकास आघाडी सरकारच्या ‘जीआर’चा मुद्दा पहिला ‘हिंदुस्थान पोस्ट’नेच उजेडात आणला!)
या ठिकाणी होणार स्पर्धा
- जुहू विलेपार्ले जिमखाना, जुहू.
- शहाजीराजे भोसले क्रीडा संकुल (अंधेरी क्रीडा संकुल)
- अंधेरी रिक्रिएशन क्लब.
अशा होणार स्पर्धा
पुरुष एकेरी
दीप राम्भीया
अनिरुद्ध मयेकर
महिला एकेरी
श्रुती फणसे
अनघा करंदीकर
पुरुष दुहेरी
विप्लव कुवले आणि विराज कुवले
अनिरुद्ध मयेकर आणि दीप राम्भीया
स्त्री दुहेरी
अनघा करंदीकर आणि मानसी कारेकर
काशिका महाजन आणि निधी दवे
संमिश्र दुहेरी
दीप राम्भीया आणि प्राजक्ता सावंत
सिद्धेश राऊत आणि अनघा करंदीकर
स्त्री दुहेरी ३५ +
अजिता कोश्ये आणि राजेश भानुशाली
निरंजन शहाणे आणि राघव भोसले
पुरुष दुहेरी ४५ +
जॉर्ज कोश्ये आणि राजेश भानुशाली
निरंजन शहाणे आणि राघव भोसले
Join Our WhatsApp Community