बॅटमिंटन क्वीनला हरवत, इतिहास रचणारी मालविका आहे तरी कोण?

बॅटमिंटन क्वीन सायना नेहवालला आपला आदर्श मानून देशातील हजारो-लाखो मुली बॅटमिंटन खेळत आहेत. गुरुवारी इंडियन ओपन बॅटमिंटन स्पर्धेत अवघ्या 20 वर्षीय मालविका बनसोडने ऑलम्पिक विजेती सायना नेहवालला जोरदार झुंज दिली आणि 17-21, 9-21 अशा सरळ दोन सेटमध्ये सायनाला पराभूत केलं. सायनासाठी हा पराभवाचा मोठा धक्का मानला जात आहे. 20 वर्षीय मालविका  बनसोडकडून अवघ्या 34 मिनिटांत सायनाचा पराभव झाला.

सायना माझा आदर्श

सायनाला हरवून इतिहास रचणारी मालविका बनसोड ही मूळची महाराष्ट्रातील नागपूर शहरातील आहे. ती बॅटमिंटनची उगवती स्टार आहे. सायनाला पराभूत केल्यानंतर मालविका म्हणाली, मी सायना नेहवालला लहानपणापासून बघून बॅटमिंटन खेळायला शिकले आहे. ती माझा आदर्श आहे, तिला पराभूत करणे माझ्यासाठी स्वप्नापेक्षा कमी नाही.

( हेही वाचा:  … तरच कोरोना चाचणी केली जाणार, आयसीएमआरचे नवे नियम! )

मालविकेची अशी आहे कामगिरी

मालविकाने 13 वर्षांखालील आणि 17 वर्षांखालील स्तरावर राज्य स्पर्धा जिंकली आहे. 2018 मध्ये जागतिक ज्युनियर बॅटमिंटन स्पर्धेसाठी तिची भारतीय संघात निवड झाली होती. इतकेच नाही, तर तिने 2018 मध्ये कडमांडू येथे दक्षिण आशियाई बॅटमिंटन चॅम्पियनशिप जिंकली आहे. दोन वर्षांपूर्वी 2019 मध्ये तिने अखिल भारतीय वरिष्ठ रँकिंग स्पर्धा जिंकली होती. त्याच वर्षी 2019 मध्ये मालविकाने मालदीव इंटरनॅशनल फ्युचर सिरीज स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here