सुरेश रैना IPL आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणार नाही; ट्वीट करत दिली माहिती

इंडियन प्रीमियर लीग तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये सुरेश रैना आता दिसणार नाही. त्याने संपूर्ण क्रिकेटला पूर्णपणे अलविदा केला आहे. रैनाने देशांतर्गत क्रिकेटमधून पुर्णपणे निवृत्ती घेतली असून, यापुढे तो IPL मध्ये खेळताना सुद्धा दिसणार नाही. आता तो भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी संलग्न असलेल्या कोणत्याही स्पर्धेचा भाग असणार नाही, असे ट्वीट सुरेश रैनाने केले आहे.

मिस्टर आयपीएल म्हणून ओळखल्या जाणा-या सुरेश रैनाने 15 ऑगस्ट 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आयपीएलच्या 205 सामन्यांमध्ये 5 हजार 528 धावा करणा-या रैनाला गेल्या वर्षी चेन्नई सुपर किंग्जने संघात कायम ठेवले नाही आणि मेगा अॅक्शनमध्येही तो अनसोल्ड ठरला. गाझियाबादच्या आयपीएल क्रिकेट मैदानावर रैना गेल्या एक आठवड्यापासून सराव करत आहे.

( हेही वाचा: शाळांप्रमाणेच महाविद्यालयातही राष्ट्रगीत सुरु होणार? )

सुरेश रैनाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

सुरेश रैनाने 226 एकदिवसीय, 18 कसोटी आणि 78 टी-20 सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने पाच शतक आणि 36 अर्धशतकांच्या मदतीने 5 हजार 615 धावा केल्या आहेत. तर, कसोटीत त्याच्या नावावर 768 धावांची नोंद आहे. याशिवाय टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 1 हजार 605 धावा केल्या आहेत. ज्यात एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here