Sports Star 2023 : वर्ष गाजवलेले स्पोर्ट्स स्टार

Sports Star 2023 : क्रिकेट सोडून इतर खेळात पुढे आलेल्या आणि खेळात नवीन मापदंड स्थापित केलेल्या खेळाडूंवर आणि त्यांच्या कामगिरीवर टाकलेली नजर

251
Sports Star 2023 : वर्ष गाजवलेले स्पोर्ट्स स्टार
Sports Star 2023 : वर्ष गाजवलेले स्पोर्ट्स स्टार

ऋजुता लुकतुके

कुठल्याही खेळात मैदानावरील कामगिरी जास्त महत्त्वाची. (Sports Star 2023) इथं पदकं आणि विक्रम लक्षात ठेवले जातात आणि २०२३ ने तसे कितीतरी क्षण भारतीय क्रीडा रसिकांना अनुभवायला दिले. एकतर आशियाई क्रीडा स्पर्धा होत्या. जागतिक अजिंक्यपद, तसंच राष्ट्रकूल स्पर्धेतही भारतीय खेळाडू चमकत राहिले. या वर्षाचा आढावा घेताना क्रिकेट सोडून इतर खेळात पुढे आलेल्या आणि खेळात नवीन मापदंड स्थापित केलेल्या खेळाडूंवर आणि त्यांच्या कामगिरीवर नजर टाकूया….

(हेही वाचा – Jagdeep Dhankhar : मला तुम्हाला लाजवायचे नाही पण…; उपराष्ट्रपती धनखड यांचे मल्लिकार्जुन खर्गेंना चर्चेचे निमंत्रण)

नीरज चोप्रा

टोकियो ऑलिम्पिकने (Tokyo Olympics) भारताला दिलेला हा नवा स्टार आहे. त्या ऑलिम्पिक नंतर नीरजने (Neeraj Chopra) हे सिद्ध केलंय की, त्याची कामगिरी म्हणजे नशिबाने लागलेला तुक्का नव्हता. तर तो लंबी रेस का घोडा है. आंतरराष्ट्रीय स्तरावर लागणारी मानसिक कणखरता त्याच्याकडे ठासून भरली आहे आणि ही कणखरता टिकवण्यासाठी लागणारा सराव करण्यात तो कमी पडत नाही. मोठी उद्दिष्ट ठेवतो आणि ती सर करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतो.

२०२३ मध्येही त्याने विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण, प्रतिष्ठेच्या डायमंड लीगमध्ये (Diamond League) रौप्य आणि आशियाई खेळात सुवर्ण जिंकलं आहे. ८९.९४ मीटरची भालाफेक ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा आशियाई क्रीडास्पर्धेत त्याने सहकारी किशोर जानाचा उत्साह वाढवताना बजावलेली ज्येष्ठ खेळाडूची भूमिकाही कौतुकास्पद आहे. आशियाई स्तरावर पहिल्यांदा सुवर्ण आणि रौप्य भारताच्या नावावर लागलं. आता नीरजला आस आहे ती ९० मीटरचा टप्पा पार करण्याची.

(हेही वाचा – Ajit Pawar : मी ६० वर्षांचा झाल्यावर भूमिका घेतली, काहींनी ३८व्या वर्षी घेतली; अजित पवारांनी नाव न घेता शरद पवारांवर केली टीका)

सात्त्विक साईराज रांकीरेड्डी, चिराग शेट्टी

बॅडमिंटन दुहेरीतील या जोडीचं नाव एकत्र घ्यावं लागेल इतका त्यांचा खेळ कोर्टवर एकजीव झाला आहे. यंदाचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार (Major Dhyan Chand Khel Ratna Award) याच जोडीला मिळणार आहे. कारण, मैदानावरची त्यांची कामगिरीच तशी खणखणीत आहे. २०२३ मध्ये आशियाई विजेतेपद मिळवण्याबरोबरच दोघांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतही बाजी मारली आहे. जागतिक क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावणारी बॅडमिंटनमधली ही पहिली जोडी आहे. तर यावर्षी दोघांनी तब्बल चार सुपर सीरिज स्पर्धा जिंकल्या आहेत.

अदिती स्वामी

महाराष्ट्रातील साताऱ्याची अदिती स्वामी फक्त १७ वर्षांची आहे. पण, २०२३ च्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कम्पाऊंड प्रकारात तिने सुवर्ण जिंकलं तेव्हा पहिल्यांदा तिने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं. भारताची ती पहिली आणि सगळ्यात तरुण तिरंदाज आहे. त्यानंतर आशियाई क्रीडास्पर्धेत कामगिरीतील सातत्य दाखवून देत तिने महिलांच्या सांघिक स्पर्धेत सुवर्ण तर वैयक्तिक प्रकारात कांस्य जिंकलं.

(हेही वाचा – Koregaon Bhima : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी ८ ते १२ जानेवारीदरम्यान आयोगाची सुनावणी)

शीतल देवी

पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यानचा शीतल देवीचा (Sheetal Devi) व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. दोन्ही हात नसलेली ही तिरंदाज एका पायाने धनुष्य पकडून दुसऱ्या पायाने लक्ष्य साधत होती. फक्त १६ वर्षांची असलेली शीतल काश्मीरची आहे आणि जगातील पहिली आणि एकमेव दोन्ही हात नसलेली पॅरा तिरंदाज आहे. आशियाई क्रीडास्पर्धेत कम्पाऊंड प्रकारात तिने वैयक्तिक आणि मिश्र सांघिक प्रकारात सुवर्ण जिंकलं आहे. तर दुहेरीत तिला रौप्य मिळालंय.

अविनाश साबळे

२९ वर्षीय अविनाश साबळे (Avinash Sable) मागचं एक दशक लांब पल्ल्याच्या शर्यतीत भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. प्रत्येक सामन्यागणिक कामगिरीत प्रगती करत आहे. २०२०च्या टोकयो ऑलिम्पिकमध्येही (Tokyo Olympics) त्याने ३००० मीटर स्टीपल चेस प्रकारात नवा राष्ट्रीय विक्रम केला होता. पण, त्याच्या हिटमध्ये तो सातवा होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची म्हणावी तशी दखल घेतली गेली नव्हती. पण, पठ्ठ्याने प्रयत्न सोडले नाहीत आणि त्याचं फळ आशियाई क्रीडास्पर्धेत त्याला मिळालं.

भारतीय सैन्यदलात नायब सुभेदार असलेला अविनाश होआंगझाओमध्ये झालेल्या आशियाई क्रीडास्पर्धेत सुवर्ण जिंकून गेला. ३००० मीटर स्टीपल चेजमध्ये (Steeple Chase) सुवर्ण तर ५००० मीटरमध्ये रौप्य अशी त्याची घवघवीत कामगिरी होती. अविनाशच्या इतक्या वर्षांच्या मेहनतीला मिळालेलं हे फळ असल्यामुळे हे यश उठून दिसणारं आहे.

(हेही वाचा – Rammandir Dombivli : डोंबिवली येथे उभारली राममंदिराची प्रतिकृती; 2 महिने घेता येणार दर्शन)

पारुल चौधरी

पारुल चौधरीच्या (Parul Chaudhary) बाबतही तेच म्हणावं लागेल. २८ वर्षीय पारुल आता ऐन भरात आहे. २०२३ मध्ये तिने आशियाई क्रीडास्पर्धेत ५००० मीटर शर्यतीत सुवर्ण तर ३००० मीटर स्टीपल चेजमध्ये रौप्य जिंकलं आहे. तर ३००० मीटरचं अंतर ९ सेकंदांच्या आत पूर्ण करणारी ती पहिली भारतीय महिला आहे. बँकॉक इथं झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही तिने एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकलं आहे.

वैशाली रमेशबाबू

भारताचा छोटा बुद्धिबळ स्टार आर प्रग्यानंदची Vaishali Rameshbabu ही मोठी बहीण. २०२३ साली तिनेही आपल्या भावाप्रमाणे आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर होण्याचा बहुमान मिळवला आहे. कोनेरु हम्पी आणि हरिका द्रोणवल्ली यांच्या नंतरची ती फक्त तिसरी भारतीय महिला ग्रँडमास्टर आहे. त्याचबरोबर यावर्षी आपल्या भावाप्रमाणेच तिनेही प्रतिष्ठेच्या कॅन्डिडेट कपसाठी पात्र होण्यात यश मिळवलं आहे. वैशालीचे वडील रमेशबाबू यांनी २८ व्या वर्षी चांगल्या पगाराची नोकरी सोडली आणि ते बुद्धिबळाचे पूर्णवेळ प्रशिक्षक बनले. हेतू हाच होता की, मुलांना चांगलं प्रशिक्षण द्यावं. आज त्यांची दोन्ही मुलं आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर आहेत. आणि अर्जुन पुरस्कार विजेती आहेत. तर खुद्द रमेशबाबू यांनाही द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.