-
ऋजुता लुकतुके
भारतीय पुरुष हॉकी संघाने आज दमदार कामगिरी करुन पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics) सलग दुसऱ्या कांस्य पदकाची कमाई केली आहे. स्पेनचा २-१ ने पराभव करत भारतीय खेळाडूंनी पदक निश्चित केलं तेव्हा खेळाडूंनी मैदानातच जल्लोष सुरू केला. त्याच्या केंद्रस्थानी होता गोलकीपर पी आर श्रीजेश (Sreejesh Retires). ३७ वर्षीय श्रीजेश आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळत होता. त्यामुळे त्याला भावपूर्ण निरोप देण्याचा सहकाऱ्यांचा प्रयत्न होता. शिवाय या ऑलिम्पिकमध्ये श्रीजेशने केलेल्या अभेद्य बचावामुळेच भारताला हे पदक शक्य झालं होतं. श्रीजेशचा बचाव आणि हरमनप्रीतचे गोल हे भारतीय कामगिरीचं वैशिष्ट्य ठरलं.
(हेही वाचा- Swapnil Kusale Comes Home : ऑलिम्पिक कांस्य विजेत्या मराठमोळ्या स्वप्निल कुसाळेचं जंगी स्वागत )
त्यामुळेच, भारताला स्पेनविरुद्ध विजयाचा मार्ग सोपा झाला आणि भारताने पॅरीस ऑलिंपिक स्पर्धेत कास्य पदकावर आपलं नाव कोरलं. (Sreejesh Retires)
Our Hockey Heroes!🏑🇮🇳 pic.twitter.com/6mCbaiUeFK
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) August 8, 2024
केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्याच्या किझक्कम्बलम गावातील शेतकरी कुटुंबातील पीआर श्रीजेश वयाच्या १८व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या श्रीजेशने भारताकडून ३ ऑलिम्पिकमध्ये राष्ट्रीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. (Sreejesh Retires)
स्पेन विरुद्ध भारताचा सामना गोलकीपर पीआर श्रीजेशचा शेवटचा सामना. श्रीजेशने ऑलिम्पिक सुरु होण्यापूर्वीच ही स्पर्धा शेवटची असल्याचं जाहीर केलं होतं. भारतीय संघाचा पीआर श्रीजेशला सुवर्णपदकाच्या विजयासह निरोप देण्याचा प्रयत्न होता. मात्र, जर्मनीविरुद्ध पराभव झाल्यानंतर कांस्य पदकाची लढत भारताला स्पेन विरुद्ध लढावी लागली. पीआर श्रीजेशनं कांस्य पदकाच्या लढतीपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करुन आपल्या भावना मांडल्या होत्या. त्यामुळे, कास्य पदकाची कमाई केल्यानंतर श्रीजेशची निवृत्तीही जाहीर झाली आहे. (Sreejesh Retires)
(हेही वाचा- Delhi Police : पुणे ISIS मॉड्यूल संबंधित वाँटेड दहशतवादी रिझवान अटकेत)
पीआर श्रीजेशने २००६ मध्ये दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतून भारतीय हॉकीमध्ये पदार्पण केलं. हॉकी इंडियाच्या वरिष्ठ टीममध्ये श्रीजेशला २०१० मध्ये संधी मिळाली. तेव्हापासून भारतीय हॉकी संघात अनेक बदल होत गेले मात्र, पीआर श्रीजेश यांच्यावर भारतीय हॉकीच्या व्यवस्थापनाचा विश्वास कायम होता. पीआर श्रीजेशने भारतासाठी आतापर्यंत ३२८ सामने खेळले आहेत. श्रीजेशने तीन ऑलिम्पिकमध्ये देखील सहभाग घेतला होता. राष्ट्रकूल स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा आणि विश्वकप स्पर्धेतही भारताचं प्रतिनिधीत्व केलं. टोक्यो ऑलिम्पिमध्ये भारताच्या हॉकी संघाला ४१ वर्षानंतर कांस्य पदक मिळालं होतं, त्यामध्ये पीआर श्रीजेशचं योगदान महत्त्वाचं होतं. स्पेन विरुद्धच्या सामन्यापूर्वी हॉकी इंडियानं ‘विन इट फॉर श्रीजेश’ अभियान सुरु केलं होतं. (Sreejesh Retires)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community