- ऋजुता लुकतुके
श्रीलंकेच्या लंका प्रिमिअर लीगमध्ये मॅच फिक्सिंगवरून गोंधळ निर्माण झाला आहे. बुधवारी अचानक लीगमधील एक फ्रँचाईजी दंबुला थंडर्सचे मालक तामिम रहमान यांना मॅच फिक्सिंगच्या आरोपावरून अटक केल्याची बातमी आली. तामिम हे बांगलादेशी वंशाचे ब्रिटिश नागरिक आहेत. त्यांनी दंबुला थंडर्स संघात मोठी गुंतवणूक केली आहे. रहमान यांना अटकेनंतर ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Sri Lanka Match Fixing)
यंदाच्या एप्रिल महिन्यात रहमान यांनी आपली फ्रँचाईजी इम्पिरिअल स्पोर्ट्स ग्रुप कंपनीला विकली होती. रहमान यांच्यावर नेमके कुठले आरोप आहेत हे अजून स्पष्ट नाही. पण, मॅच फिक्सिंग विरोधी कायदा आणि सट्टेबाजी या कायदान्वये अटक झाल्याचं निश्चित आहे. एक जुलैपासून यंदा एलपीएल सुरू होणार आहे आणि त्यापूर्वी झालेल्या या कारवाईमुळे खळबळ माजली आहे. (Sri Lanka Match Fixing)
(हेही वाचा – IPL 2024, RR vs RCB : दिनेश कार्तिकचा नाबादचा निर्णय का चुकीचा होता?)
ही फ्रँचाईजीच रद्द करण्याचा घेतला निर्णय
अशाच एका प्रकरणात भारतीय नागरिक असलेले योनी पटेल आणि आकाश पी यांच्याविरोधातही श्रीलंकेनं कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. लिजंड्स क्रिकेट लीगचे काही सामने श्रीलंकेत झाले. त्या दरम्यान या दोघांनी मॅच फिक्सिंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दोघांचे पासपोर्ट श्रीलंकन अधिकाऱ्यांना देण्याचे निर्देश या दोघांना देण्यात आले आहेत. या दोघांची सध्या जामिनावर सुटका झाली आहे. पण, त्यांना लंका सोडता येणार नाही. (Sri Lanka Match Fixing)
आताच्या प्रकरणात श्रीलंकन क्रिकेट बोर्डानेही कडक कारवाई करताना दंबुला थंडर्स ही फ्रँचाईजीच रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. श्रीलंका हा पहिला दक्षिण आशियाई देश आहे जिथे मॅच फिक्सिंग हा कायद्याने गुन्हा आहे. फिक्सिंगचा आरोप सिद्ध झाला तर दंडाबरोबरच १० वर्षांपर्यंतच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद तिथल्या कायद्यात आहे. (Sri Lanka Match Fixing)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community