T20 World Cup : बलात्कार प्रकरणी श्रीलंकेच्या फलंदाजाला ऑस्ट्रेलियात अटक

148

श्रीलंकेचा आघाडीचा फलंदाज दनुष्का गुनाथिलका याला बलात्कार प्रकरणी सिडनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान रविवारी सकाळी श्रीलंकेचा संघ त्याच्याशिवाय मायदेशी परतला. क्रिकेटपटूला अटक केल्यामुळे ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकादरम्यान श्रीलंकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.

गुणथिलकाला अटक 

ऑस्ट्रेलियन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुणथिलका याने बुधवारी संध्याकाळी महिलेवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर त्याला रविवारी सकाळी सिडनीच्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमधील टीम हॉटेलमधून अटक करण्यात आली. सध्या या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

गुणथिलकाच्या विरोधात २९ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुणथिलका आणि पीडित महिलेची ओळख एका डेटिंग ऍपच्या माध्यमातून झाली.

२०१८ मध्येही झाले होते आरोप 

गुणथिलकाला तीन आठवड्यांपूर्वी दुखापत झाली. त्याच्या जागी अशेन बंडारा याला संघात घेण्यात आले होते. मात्र संघ व्यवस्थापनाने त्याला घरी पाठवण्याऐवजी संघासोबतच ठेवले होते. गुणथिलकाने १०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्यावर २०१८ मध्येही असाच आरोप करण्यात आला होता. तेव्हा गुणथिलकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. पण तपासानंतर त्याची सुटका करून त्याच्या मित्राला अटक करण्यात आली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.