Stars in Ranji Trophy : बीसीसीआयच्या दणक्यानंतर रोहित, रिषभ सह हे स्टार खेळाडू खेळणार रणजी सामना 

Stars in Ranji Trophy : विराट, राहुल यांनी मात्र रणजीपासून दूरच राहणं पसंत केलं आहे

35
Stars in Ranji Trophy : बीसीसीआयच्या दणक्यानंतर रोहित, रिषभ सह हे स्टार खेळाडू खेळणार रणजी सामना 
Stars in Ranji Trophy : बीसीसीआयच्या दणक्यानंतर रोहित, रिषभ सह हे स्टार खेळाडू खेळणार रणजी सामना 
  • ऋजुता लुकतुके

बीसीसीआयच्या खेळाडूंसाठीच्या आचारसंहितेनंतर रोहित आणि रिषभ पंत यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी रणजी सामना खेळण्याचं ठरवलं आहे. कर्णधार रोहित शर्माही २३ तारखेपासून सुरू होणाऱ्या मुंबई विरुद्ध जम्मू व काश्मीर सामन्यात मुंबईकडून खेळणार आहे. आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आणि देशांतर्गत क्रिकेट यामधील समतोलाविषयी अलीकडेच पत्रकार परिषदेत रोहीतने बोलून दाखवलं होतं. ‘मी जम्मू व काश्मीर विरुद्धचा सामना तर खेळणारच आहे. पण, तुम्हाला एक सांगतो. मागच्या ६ – ७ वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आम्ही इतके व्यस्त आहोत की, बहुतेक खेळाडूंनी सलग ४५ दिवस भारतात घालवलेले नाहीत. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेट खेळणं जितकं महत्त्वाचं तसंच व्यस्त कार्यक्रमातून विश्रांती घेणंही महत्त्वाचं आहे,’ असं रोहीत तेव्हा म्हणाला होता. (Stars in Ranji Trophy)

(हेही वाचा- विधानसभा निवडणुकीमुळे स्थगित केलेली Mukhyamantri Teerth Darshan Yojana अद्यापही बंदच; ज्येष्ठांमध्ये नाराजीचा सूर)

ऑस्ट्रेलियातील खराब कामगिरीनंतर भारतीय फलंदाजांच्या तंत्रावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर सह बीसीसीआयनेही याबद्दल खेळाडूंचे कान ओढले आहेत. बीसीसीआयने तर खेळाडूंसाठी दशसूत्रीच काढली आहे. आणि त्यात खेळाडूंची आंतरराष्ट्रीय मालिकांसाठी निवड देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीच्या निकषावर होईल असं म्हटलं आहे. (Stars in Ranji Trophy)

भारतीय संघ इंग्लंड विरुद्धची एकदिवसीय मालिका खेळपर्यंत रणजीचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. आणि मालिकेपूर्वी खेळाडूंना २ रणजी सामने खेळण्यास वाव आहे. त्यानुसार, रोहित शर्मा, यशस्वी जयसवाल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, नितिश रेड्डी हे खेळाडू आपापल्या रणजी संघाकडून खेळणार आहेत. त्यामुळे दिल्ली विरुद्ध सौराष्ट्र सामन्यात रवींद्र जडेजा विरुद्ध रिषभ पंत असा मुकाबला दिसणार आहे. (Stars in Ranji Trophy)

(हेही वाचा- Jasprit Bumrah : फेब्रुवारीत कळणार जसप्रीत बुमराह खेळण्यासाठी किती तंदुरुस्त?)

रोहित शर्मा गेला आठवडाभर मुंबईच्या रणजी संघाबरोबर सराव करत आहे. रोहित आणि रिषभ या दोघांनीही रणजी संघांची घडी बिघडू नये यासाठी कर्णधारपदापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. पण, ते सामान्य खेळाडू म्हणून खेळणार आहेत. हार्दिक पांड्याही बडोद्याकडून खेळणार आहे. (Stars in Ranji Trophy)

विराट कोहली आणि के एल राहुल यांनी मात्र बीसीसीआयकडून न  खेळण्याची परवानगी घेतल्याचं समजतंय. विराट कोहलीची मान दुखावलीय. तो त्यासाठी इंजेक्शन घेतोय. तर राहुलने ऑस्ट्रेलियातून परतल्या परतल्या दुखापतीवर उपचारांसाठी वेळ मागून घेतला होता. दोघंही पुढच्या रणजी सामन्यात खेळतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Stars in Ranji Trophy)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.