-
ऋजुता लुकतुके
ऑस्ट्रेलियातील फ्लॉपशोनंतर भारताचे स्टार खेळाडू रणजी स्पर्धेत आपापल्या राज्याचं प्रतिनिधित्व करताना दिसत आहेत. पण, यात रवींद्र जडेजाचा अपवाद सोडला तर इतर खेळाडू दुसऱ्या डावांतही फ्लॉप ठरले आहेत. जडेजाने मात्र सौराष्ट्राकडून खेळताना सामन्यांत १२ बळी मिळवले. तर फलंदाजीतही त्याने चमक दाखवली आहे. दुसरीकडे, रोहित व यशस्वी जयसवाल मुंबईकडून तर रिषभ पंत दिल्लीकडून खेळताना पुन्हा एकदा फ्लॉप ठरले. राजकोटमध्ये खेळताना, जडेजाने पहिल्या डावांत ५६ धावांत ५ बळी मिळवले होते. दुसऱ्या डावांत त्याने कमाल करताना ३८ धावांत ७ बळी मिळवले. (Stars @Ranji Trophy)
जडेजाच्या कामगिरीच्या जोरावर सौराष्ट्र संघाने दिल्लीविरुद्ध १० गडी राखून विजय मिळवला. आणि विजयाचा बोनस गुणही काबीज केला. याच सामन्यात स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत दिल्लीकडून खेळला. पण, तो दोन्ही डावांत अनुक्रमे १ आणि १७ धावा करू शकला. तर मुंबई विरुद्ध जम्मू व काश्मीर सामन्यात रोहीतची अवसानघातकी फलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. (Stars @Ranji Trophy)
Stumps on Day 2!
Another action-packed day!
J & K took an 86-run lead. Mumbai fought back from 101/7 to end the Day 2 on 274/7.
Shardul Thakur (113*) & Tanush Kotian (58*) put on an unbeaten 173-run stand.
Scorecard ▶️ https://t.co/oYXDhqotjO#RanjiTrophy | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/gecECtixPC
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 24, 2025
पहिल्या डावांत १९ चेंडूंत ३ धावा करून तो बाद झाला होता. दुसऱ्या डावांत त्याने ३ षटकारांसह २८ धावा केल्या. पण, खराब फटका खेळून तो बाद झाला. (Stars @Ranji Trophy)
रोहितचा सलामीचा साथीदार यशस्वी जयसवालही २७ धावा करून बाद झाला. पहिल्या डावांत १२० धावांत गारद झालेला मुंबईचा संघ ५ बाद ८५ असा अडखळत असताना शार्दूल ठाकूरने नाबाद ११७ धावा करत मुंबईचा डाव सावरला आहे. तर तनुष कोटियनने त्याला अर्धशतक झळकावत साथ दिली आहे. दोघांच्या शतकी भागिदारीमुळे मुंबईने १८० धावांची आघाडी घेतली आहे. या सामन्यात मुंबईकर श्रेयस अय्यरही फ्ल़ॉप ठरला. (Stars @Ranji Trophy)
(हेही वाचा- “ट्रम्प २०२० साली हरले नसते तर…” ; Vladimir Putin यांनी ट्रम्प यांचा उल्लेख करत केलं मोठं विधान)
बंगळुरू इथं कर्नाटक विरुद्ध पंजाब सामन्यात शुभमन गिल खेळत आहे. पंजाबचा संघ पहिल्या डावांत ५५ धावांतच गुंडाळला गेला. यात शुभमनने ४ धावांचं योगदान दिलं. अशाप्रकारे स्टार खेळाडू फ्लॉप होताना दिसले. आता रणजीच्या दुसऱ्या सामन्यात दिल्लीकडून विराट कोहली खेळणार आहे. (Stars @Ranji Trophy)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community