State Kho Kho Championship 2025 : राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत आता बाद फेरीचा थरार

State Kho Kho Championship 2025 : गटवार साखळीतील विजेते आता ठरले आहेत.

31
State Kho Kho Championship 2025 : राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत आता बाद फेरीचा थरार
  • ऋजुता लुकतुके

हिरकमहोत्सवी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत साखळी सामने आता संपले असून बाद फेरीचा थरार सुरू झाला आहे. पुरुष गटात धाराशिव, सोलापूर, सांगली यांनी तर महिला गटात धाराशिव, मुंबई उपनगर व रत्नागिरी यांनी विजय मिळवत गटात अव्वल स्थान मिळवले आहे. ही हिरकमहोत्सवी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा आहे. यातूनच राष्ट्रीय स्पर्धेसाठी महिला व पुरुष संघांची निवड होणार आहे. (State Kho Kho Championship 2025)

सकाळच्या सत्रात महिला गटात धाराशिव संघाने छ. संभाजीनगरचा १ डाव १७ गुणांनी पराभव केला. विजयी संघातर्फे मिताली पवार (३.४० मि. संरक्षण), संध्या सुरवसे (३ मि. संरक्षण व ४ गुण) यांनी चांगला खेळ केला. दुसऱ्या सामन्यात रत्नागिरीने जालन्याचा १२-९ असा एक डाव ३ गुणांनी पराभव केला. मुंबई साताऱ्या दरम्यानचा सामना रंगतदार झाला आणि इथं मुंबईने साताऱ्यावर फक्त एका गुणाने मात केली. मुंबईसाठी सेजल यादवने २ मिनिटं संरक्षण आणि चढाईतही २ गुण मिळवले. तर सिया नाईकनेही एकूण ४ मिनिटं संरक्षण आणि २ गुणांची कमाई केली. (State Kho Kho Championship 2025)

(हेही वाचा – IPL 2025 : आयपीएलच्या दहाही फ्रँचाईजींचे कर्णधार अखेर ठरले; ५ कर्णधार नव्या दमाचे)

पुरुष गटात धाराशिवने धुळ्याचा एक डाव ८ गुणांनी (१७-९) असा सहज पराभव केला. धाराशिव तर्फे हार्द्या वसावे, विजय शिंदे, सचिन पवार आणि भगतसिंग वसावे यांचा खेळ लक्षवेधी ठरला. दुसऱ्या सामन्यात सोलापूरने नंदुरबार चा एक डाव एक गुणाने (१२-११) पराभूत केले. सोलापूर कडून अजय कश्यप, जुबेर शेख यांनी चांगला खेळ केला. तर नंदुरबार तर्फे कैलास पटेलने एक मिनिट संरक्षण आणि १ गुण मिळवून चमक दाखवली. तिसऱ्या सामन्यात सांगलीने साताऱ्याचा १ डाव ४ गुणांनी (१६-१२) पराभव केला. (State Kho Kho Championship 2025)

यजमान अहिल्यानगरने नाशिकचा २ गुण व ५ मि. ४० सेकंद राखून (१३-११) विजय मिळवला. अहिल्यानगरतर्फे रामेश्वर नरेंद्र, शिवाजी सारंग यांनी तर नाशिक तर्फे ओम कांगणे यांनी चांगला खेळ केला. साखळी सामन्यात पुरुष गटात पुणे, मुंबई उपनगर, ठाणे, सांगली, सोलापूर, धाराशिव, मुंबई यांनी तर महिला गटात ठाणे, पुणे, धाराशिव, रत्नागिरी, मुबंई यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. प्रसिद्ध अल्टीमेट खो-खो स्पर्धा आणि नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या जागतिक खो-खो स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघात सहभागी महाराष्ट्रातील खेळाडू प्रतीक वाईकर, प्रियांका इंगळे, सुयश गरगटे, अनिकेत पोटे, रेश्मा राठोड, अश्विनी शिंदे हे विविध संघातून या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत. त्यांचा खेळ पाहण्यासाठी नगरवासियांनी खंडोबा मैदानावर यावे असे आवाहन अहमदनगर खो-खो असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे. (State Kho Kho Championship 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.