-
ऋजुता लुकतुके
श्रीलंकेविरुद्घ गॉल कसोटीत चहापानापूर्वीच्या षटकांत स्टिव्ह स्मिथने जयसूर्याचा एक चेंडू ड्राईव्ह केल्यानंतर तीन धावा काढल्या. आणि त्यामुळे त्याने डावात खातं तर उघडलंच शिवाय एक अनोखा मापदंड ओलांडला. त्यामुळे शतक झालेलं नसतानाही त्याने स्टेडिअमच्या चारही बाजूंनी बॅट उंचावत आपला आनंद साजरा केला. कारण, कसोटीत त्याची १०,००० वी धाव होती. आणि त्याचा हा आनंद होता. तसंच आंतरराष्ट्रीय कसोटीतील हे त्याचं ३५ वं शतक होतं. (Steve Smith)
(हेही वाचा- पालिका प्रसूतिगृहांचे सोशल ऑडिट होणार ; High Court कडून समिती स्थापन, अहवाल सादर करण्याचे निर्देश)
आधीच्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेत सिडनी कसोटी संपल्यानंतर तो या मापदंडापासून फक्त १ धाव दूर होता. पण, मध्ये त्याला २४ दिवस थांबावं लागलं. पण, गॉल कसोटीत त्याने औचित्य साधलं. इतकंच नाही तर २०५ डावांमध्ये स्मिथने १०,००० धावा पूर्ण केल्या आहेत. आणि जलद १०,००० धावांचा टप्पा गाठणाऱ्यांमध्ये आता तो पाचवा आहे. फक्त ब्रायन लारा, सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा आणि रिकी पाँटिंग त्याच्या पुढे आहेत. (Steve Smith)
The man of the moment 💪
Steve Smith chats with @Tom_Wilson7 about reaching 10,000 Test runs #SLvAUS pic.twitter.com/2jZwy86tRQ
— 7Cricket (@7Cricket) January 29, 2025
सर्वात जलद १०,००० धावा पूर्ण करणारे कसोटीपटू (डावांच्या हिशोबाने)
ब्रायन लारा – १९५ डाव
सचिन तेंडुलकर – १९५ डाव
कुमार संगकारा – १९५ डाव
रिकी पाँटिंग – १९६ डाव
स्टिव्ह स्मिथ – २०५ डाव
राहुल द्रविड – २०६ डाव
(हेही वाचा- Virat Kohli : विराट कोहलीने दिल्ली संघाबरोबर केला जोरदार सराव, नम्रतेनं जिंकली सहकाऱ्यांची मनं)
पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत स्टिव्ह स्मिथ संघाचं नेतृत्वही करत आहे. शिवाय १०,००० धावांचा टप्पा ओलांडणारा तो आता पंधरावा कसोटीपटू ठरला आहे. सुनील गावसकर यांनी पहिल्यांदा कसोटीत हा टप्पा सर केला. त्यांच्यानंतर आणखी १४ जणांनी हा टप्पा ओलांडला आहे. (Steve Smith)
सचिन तेंडुलकर (भारत) – १६,९२१
रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) – १३,३७८
जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) – १३,२८९
राहुल द्रविड (भारत) – १३,२८८
जो रुट (इंग्लंड) – १२,९७२
ॲलिस्टर कूक (इंग्लंड) – १२,४७२
कुमार संगकारा (श्रीलंका) – १३,१२,४००
ब्रायन लारा (वेस्ट इंडिज) – ११,९५३
शिवनारायण चंद्रपॉल (वेस्ट इंडिज) – ११,८६७
महेला जयवर्धने (श्रीलंका) – ११,८१४
ॲलन बोर्डर (ऑस्ट्रेलिया) – ११,१७४
स्टिव्ह वॉ (ऑस्ट्रेलिया) – १०,९२७
सुनील गावसकर (भारत) – १०,१२२
युनिस खान (पाकिस्तान) – १०,००५
स्टिव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) – १०,१०३
Join Our WhatsApp Community