IPL 2025 : आयपीएलमध्ये खेळाडूंसाठी कडक आचारसंहिता, प्रवासाचे नियम लागू, कुटुंबीयांच्या बरोबर असण्यावरही मर्यादा

IPL 2025 : आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठीही असेच निर्बंध बीसीसीआयने घातले आहेत.

50
IPL 2025 : आयपीएलमध्ये खेळाडूंसाठी कडक आचारसंहिता, प्रवासाचे नियम लागू, कुटुंबीयांच्या बरोबर असण्यावरही मर्यादा
IPL 2025 : आयपीएलमध्ये खेळाडूंसाठी कडक आचारसंहिता, प्रवासाचे नियम लागू, कुटुंबीयांच्या बरोबर असण्यावरही मर्यादा
  • ऋजुता लुकतुके

चॅम्पियन्स करंडक (Champions Trophy) संपल्यानंतर आयपीएलचा (IPL 2025) थरार सुरू होणार आहे. आणि यंदा बीसीसीआय (BCCI) खेळाडूंच्या व्यावसायिकता आणि शिस्तीच्या बाबतीत कठोर भूमिका घेणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय खेळाडूंसाठी आखून दिलेल्या आचारसंहितेचं पालन आयपीएल (IPL 2025) दरम्यानही करण्यात येणार आहे. सामन्यासाठी तसंच प्रवासासाठी खेळाडूंच्या बसचा वापर करणं आणि कुटुंबीयांना सामान्यांसाठी प्रतिबंधित जागी प्रवेश न देणं या मुद्यांवर बीसीसीआय (BCCI) ठाम आहे. त्यामुळे ड्रेसिंग रुम, बीसीसीआयचे अधिकारी यांच्यासाठी राखीव जागेतही कुटुंबीयांना प्रवेश दिला जाणार नाही.

‘खेळाडूंनी प्रवासासाठी संघाच्या बसचाच वापर करावा. खेळाडूंची संख्या जास्त असेल तर संघाने दोन बसची व्यवस्था करावी,’ असं बीसीसीआयने आपल्या निर्देशांमध्ये म्हटलं आहे. क्रिकबझ (Cricbuzz) या वेबसाईटने याविषयीची बातमी दिली आहे. बीसीसीआयने (BCCI) अलीकडेच एका ईमेलद्वारे हे नियम सर्व फ्रँचाईजींना कळवले आहेत. तसंच एका बैठकीत प्रत्यक्ष नियमांवर चर्चा झाली आहे. कुटुंबीयांनाच नव्हे तर थ्रो डाऊन तज्ज आणि संघाबरोबर असलेला इतर स्टाफ यांनाही सामन्याच्या दिवशी ड्रेसिंग रुममध्ये प्रवेश नसेल. मुख्य खेळपट्टीवर खेळाडूंची तंदुरुस्ती चाचणीही इथून पुढे घेता येणार नाहीए. (IPL 2025)

सर्व फ्रँचाईजींच्या कर्णधारांची एक बैठक आता बीसीसीआयने (BCCI) २० मार्चला आयोजित केली आहे. तेव्हा खेळाडूंशी या नियमांवर चर्चा करण्यात येईल.

(हेही वाचा – Champions Trophy, Ind vs Aus : विराट कोहलीला पाठलागांचा बादशाह का म्हणतात, आकडेवारीतून आलं समोर)

फ्रँचाईजींना सरावासाठी कुठल्या सुविधा मिळणार याविषयीचे नियमही बीसीसीआयने (BCCI) बदलले आहेत. सरावासाठी प्रत्येक फ्रँचाईजीसाठी इथून पुढे दोन दोन नेट्स उपलब्ध करून दिले जातील. मैदानावरील सरावासाठी मुख्य खेळपट्टीच्या जवळ एक खेळपट्टी ठरावीक दिवसासाठी सरावासाठी मिळू शकेल. सामना असेल त्या दिवशी नेट्स किंवा तंदुरुस्ती चाचणीही करता येणार नाही. (IPL 2025)

तसंच प्रत्येक दिवशी डॉक्टर, फिजीओ अशा संघाची गरज असलेल्या एकूण १२ व्यक्तींना संघाबरोबर राहण्यासाठी विशेष ओळखपत्र दिलं जाईल. आणि त्याव्यतिरिक्त इतर कुणालाही संघाबरोबर किंवा खेळाडूंबरोबर ड्रेसिंग रुम, मैदानावर राहता येणार नाही. ऑरेंज आणि पर्पल कॅप मिळालेल्या खेळाडूंनी सामन्याची पहिली दोन षटकं तरी ही कॅप घालावी, अशी अट त्यांना घालण्यात येणार आहे. (IPL 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.