Sumit Nagal : सुमित नागल जागतिक क्रमवारीत ६८ व्या स्थानावर पोहोचला

115
Sumit Nagal : सुमित नागल जागतिक क्रमवारीत ६८ व्या स्थानावर पोहोचला 
Sumit Nagal : सुमित नागल जागतिक क्रमवारीत ६८ व्या स्थानावर पोहोचला 
  • ऋजुता लुकतुके 

टेनिसच्या जागतिक क्रमवारीत भारताचा सुमित नागल (Sumit Nagal) आता ६८ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. सोमवारी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत तो पाच स्थानं वर चढला आहे. २६ वर्षीय सुमित ऑलिम्पिकची तयारी करत असताना त्याला मिळालेली ही चांगली बातमी आहे. १९७३ पासून आतापर्यंत भारतीय खेळाडूने मिळवलेलं हे चौथं सर्वोत्तम रँकिंग आहे.

(हेही वाचा- Kanchanjunga Express चा अपघात का घडला ? काय सांगतो रिपोर्ट)

ताज्या क्रमवारीनंतर त्याने शशी मेनन (Shashi Menon) यांना मागे टाकलं आहे. १९७३ मध्येच मेनन ७१ व्या क्रमांकावर होते. आता सुमितच्या पुढे विजय अमृतराज (Vijay Amritraj) (१८), रमेश कृष्णन (Ramesh Krishnan) (२३) आणि सोमदेव देववर्मन (Somdev Devvarman) (६१) हे तीन खेळाडू आहेत. या हंगामात आतापर्यंत सुमितने ७७९ एटीपी गुण मिळवले आहेत. त्याच्याच जोरावर ऑलिम्पिकच्या एकेरीत स्थान मिळवलं आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics) एकेरीत खेळणारा तो एकमेव भारतीय टेनिसपटू आहे. (Sumit Nagal)

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सुमितने ३१ व्या क्रमांकावर असलेल्या बिबलिकला हरवलं होतं. नंतर फ्रेंच ओपन आणि विम्बल्डनमध्येही तो खेळला. शिवाय यावर्षी त्याने जर्मनीतील हेलब्रॉन आणि चेन्नई ओपन अशा दोन चॅलेंजर स्पर्धाही जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे सुमितने हेलबॉर्न स्पर्धा क्ले कोर्टवरच जिंकली आहे. पॅरिसमध्येही ऑलिम्पिक क्ले कोर्टवरच होणार आहे. सुमितची चारही चॅलेंजर विजेतेपदं क्ले कोर्टवरील आहेत. (Sumit Nagal)

(हेही वाचा- India T20 Captain : टी-२० मध्ये बीसीसीआयचा कप्तान म्हणून हार्दिकवर नाही तर ‘या’ खेळाडूवर भरवसा)

पहिल्या ७० खेळाडूंमध्ये धडक देण्याची सुमितची अर्थातच ही पहिली वेळ आहे. हा बातमी आली तेव्हा बस्ताद इथं तो पहिली फेरीही जिंकला आहे. या स्पर्धेनंतर तो थेट ऑलिम्पिकमध्ये उतरणार आहे. (Sumit Nagal)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.